नांदगावी एक कोटी सूर्यनमस्कारांची संकल्पपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:30 PM2018-01-24T14:30:32+5:302018-01-24T14:30:46+5:30

नांदगाव- नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक या संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त राबविण्यात आलेला ‘सूर्यनमस्कार एक आविष्कार’ या उपक्र मांतर्गत विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याच्या उपक्र माची मागील वर्षी याच दिवशी सुरू झालेल्या उपक्र माचा संकल्पपूर्ती सोहळा २४ जानेवारीला संपन्न झाला.

The resolution of one crore Suryanamaskar of Nandgaavi | नांदगावी एक कोटी सूर्यनमस्कारांची संकल्पपूर्ती

नांदगावी एक कोटी सूर्यनमस्कारांची संकल्पपूर्ती

Next

नांदगाव- नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक या संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त राबविण्यात आलेला ‘सूर्यनमस्कार एक आविष्कार’ या उपक्र मांतर्गत विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याच्या उपक्र माची मागील वर्षी याच दिवशी सुरू झालेल्या उपक्र माचा संकल्पपूर्ती सोहळा २४ जानेवारीला संपन्न झाला.
यात नांदगाव संकुलातील व्ही.जे.हायस्कूल,नांदगाव, मि. भि. छाजेड विद्यामंदिर, नांदगाव माध्यमिक विद्यालय सावरगाव, किसान माध्यमिक विद्यालय वाखारी, सरस्वती विद्यामंदिर मनमाड या शाळांमधील २५७५ विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य आणि सायन्स कॉलेजच्या मैदानावर सामुहिक सूर्यनमस्कार घालून एक नवीन जागतिक कीर्तिमान स्थापित केला.
या सोहळ्यास हृदयरोग तज्ञ डॉ.अनिरु द्ध धर्माधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वत: व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.वैभव पाटील, नाशिक यांनी स्वत: विद्यार्थ्यांसमवेत प्रात्यक्षिक केले. त्यांनी आपल्या मनोगतात, आजच्या यांत्रिक युगात आजची पिढी व्यायामापासून दूर जात आहे. सरासरी आयुर्मान घटत चालले आहे.पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीत योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे असे सांगून त्यांनी अष्टांग योगाचे महत्व सांगितले.आजच्या पिढीने वाईट सवयी व व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.व योग्य आहारपद्धती विषयी माहिती दिली. व विद्यार्थ्यांना आरोग्याचा मंत्र दिला. अध्यक्षस्थानी नांदगाव संकुलाचे प्रमुख शशिकांत आंबेकर होते. प्रास्ताविक सूर्यनमस्कार संकुल प्रमुख विजय चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी ५० महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल धर्मेश यादव (शौर्यचक्र विजेते ) ,नगराध्यक्ष राजेश कवडे,तहसीलदार चंद्रकांत देवगुणे ,पोलिस निरीक्षक बशीर शेख,संस्थेचे कार्यकारणी सदस्य संजीव धामणे,टी.एम. बोर्ड अध्यक्ष भैयासाहेब चव्हाण, कला,वाणज्यि आण िविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी. पटेलहे उपस्थित होते. वर्ल्ड रेकोर्ड आॅफ इंडियाचे अधिकारी उमेश गायधनी यांच्या उपस्थितीत वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना व शाळेच्या प्रमुखांना देण्यात आले.
संकल्पपूर्ती सोहळ्याचे शानदार उद्घाटन सर्व प्रमुख अतिथी व सर्व शाळांतील शालेयामतिी अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,माजी शिक्षक, पालक,नागरिक,विद्यार्थी,माजी विद्यार्थी उपस्थित होते. नियोजन सूर्यनमस्कार संकुल प्रमुख विजय चव्हाण,सहप्रमुख राहुल चिखले,प्रात्यक्षिक प्रमुख वाल्मिक जाधव,सुनिता देवरे यांनी केले.सुत्रसंचलन कु.वृषाली गढरी यांनी केले तर आभार जयंत निकम यांनी मानले.

Web Title: The resolution of one crore Suryanamaskar of Nandgaavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक