संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 07:25 PM2018-09-15T19:25:53+5:302018-09-15T19:26:14+5:30

पुनद प्रकल्पांतर्गत चणकापुर झाडी एरंडगाव वाढीव कालव्याच्या प्रलंबित कामाच्या पुर्ततेसाठी तिसगाव (ता. देवळा) येथील कालवा संघर्ष समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना गावबंदी तसेच आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांवर बंदी ठरावाचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व चांदवड देवळा विभागाचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांना देण्यात आले.

Request to District Collector on behalf of Sangharsh Samiti | संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

Next
ठळक मुद्देतिसगाव : आगामी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

उमराणे : पुनद प्रकल्पांतर्गत चणकापुर झाडी एरंडगाव वाढीव कालव्याच्या प्रलंबित कामाच्या पुर्ततेसाठी तिसगाव (ता. देवळा) येथील कालवा संघर्ष समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना गावबंदी तसेच आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांवर बंदी ठरावाचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व चांदवड देवळा विभागाचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांना देण्यात आले.
दिवसेंदिवस या भागात पर्जन्यवृष्टी कमी कमी होत असल्याने दरवर्षी भयंकर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे हा कालवा या भागातील जनतेसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे.
कालवा पुर्णत्वासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी यांनी प्रयत्न न केल्याने देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील जनतेत संतापाची लाट उसळली असुन तिसगाव व सांगवी येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना गावबंदीचा ठराव केला असुन आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी राधाकृष्णन व प्रांताधिकारी भंडारे यांना तिसगाव संघर्ष समितीचे राजेंद्र जाधव, तुषार अहेर, गोकुळ अहेर, निलेश अहेर, गोरख अहेर, मोहन अहेर यांनी दिले आहे.

Web Title: Request to District Collector on behalf of Sangharsh Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.