भाम धरणग्रस्तांचे मागण्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:17 PM2018-08-18T23:17:09+5:302018-08-18T23:17:30+5:30

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणग्रस्त व स्थानिक ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना विविध समस्यांचे निवेदन देऊन त्या त्वरित सोडविण्याचे साकडे घातले.

Request for the demands of Bhram Dam Dam | भाम धरणग्रस्तांचे मागण्यांचे निवेदन

भाम धरणग्रस्तांचे मागण्यांचे निवेदन

Next
ठळक मुद्देविविध समस्यांचे निवेदन देऊन त्या त्वरित सोडविण्याचे साकडे

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणग्रस्त व स्थानिक ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर
यांना विविध समस्यांचे निवेदन देऊन त्या त्वरित सोडविण्याचे साकडे घातले.
यावेळी सरपंच कृष्णाजी घारे, लक्की जाधव, दौलत मेमाणे, एकनाथ घारे, प्रकाश भले, ग्रामसेवक बेनाडे, केशव मानकर, विष्णू घारे, रवि बुळे, लक्ष्मण मेमाणे, प्रकाश येडे, पिंटू घारे, दुर्गेश तिटकरे, मारुती तिटकरे, गंगूबाई तिटकरे, ताराबाई डिघे, अनुसयाबाई घारे, चांगुणाबाई घारे, अनाबाई घारे, इंदूबाई घारे, लालू घारे, गजानन कोरडे, चिराग मेमाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.धरणग्रस्तांनी पुनर्वसनाबाबतच्या अडचणींचा पाढा वाचला. यावेळी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी कासार आदी अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांमध्ये महिलावर्ग व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपल्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात, अशी मागणी सर्वांनी केली. तसेच अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले.

Web Title: Request for the demands of Bhram Dam Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण