ग्रामीण भागात घरे भाड्याने देणेही होणार गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:15 AM2019-03-09T01:15:43+5:302019-03-09T01:17:03+5:30

देशपातळीवर घडणाऱ्या दहशतवादी घटनांचे पाळेमुळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागले असून, अशा दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील यापुढे अनोळखी इसमांना घरे भाड्याने देणे व त्यातून काही अनुचित घटना घडल्यास घरमालकांना महाागात पडणार आहे.

 Renting houses in rural areas will also be a crime | ग्रामीण भागात घरे भाड्याने देणेही होणार गुन्हा

ग्रामीण भागात घरे भाड्याने देणेही होणार गुन्हा

Next
ठळक मुद्देपोलीस विभाग : भाडेकरूंची माहिती द्यावी लागणार

नाशिक : देशपातळीवर घडणाऱ्या दहशतवादी घटनांचे पाळेमुळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागले असून, अशा दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील यापुढे अनोळखी इसमांना घरे भाड्याने देणे व त्यातून काही अनुचित घटना घडल्यास घरमालकांना महाागात पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अगदी दुर्गम भागातदेखील घर भाड्याने देताना त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या संदर्भात अपर जिल्हादंडाधिकारी रामदास खेडकर यांनी अधिसूचना जारी केली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात भाड्याने घर देणारे घरमालक यांनी अनोळखी इसमांची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरमालक किंवा घराचे वहिवाटदार असलेल्या सर्व व्यक्तींनी त्यांच्या मालकीची ताब्यातील घरे उदाहरणार्थ फ्लॅट, खोली, बंगला, शेड इत्यादी हे संबंधित भाडेकरू, पोटभाडेकरू किंवा भाडेपट्टी कराराने घेणाऱ्या व्यक्तींविषयीची माहिती त्या कार्यक्षेत्राच्या पोलीस स्टेशनला विहित नमुन्यात लेखी दिल्याशिवाय संबंधितांना घरे भाड्याने देऊ नये किंवा रहिवासासाठी हस्तांतरित करू नये. तसे केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

Web Title:  Renting houses in rural areas will also be a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.