पाणी टंचाई दूर करण्यासाठी ठेंगोडा येथे तळ ठोकुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 05:17 PM2018-11-01T17:17:31+5:302018-11-01T17:22:19+5:30

सटाणा:यंदा सर्वच ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळे सटाणा शहरात कधी नव्हे अशी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.यावर मात करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेसह पदाधिकारी गेल्या सात ते आठ दिवसापासून ठेंगोडा येथील पाणीपुरवठा विहीरीच्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. पाणी टंचाई निवारणासाठी तात्काळ केलेल्या उपाययोजनांमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरवासीयांना अतिरिक्त पाणी देण्यात यश येत आहे. असा दावा नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केला आहे.

To remove the water scarcity, place the base in the city of Cambodia | पाणी टंचाई दूर करण्यासाठी ठेंगोडा येथे तळ ठोकुन

पाणीटंचाईपासून मुक्त करण्यासाठी तातडीने पावले उचलली.

Next
ठळक मुद्देसटाणा : नगराध्यक्षासह सभापती, गटनेते, नगरसेवक, मुख्याधिकारी, पाणी पुरवठा कर्मचारी

सटाणा:यंदा सर्वच ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळे सटाणा शहरात कधी नव्हे अशी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.यावर मात करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेसह पदाधिकारी गेल्या सात ते आठ दिवसापासून ठेंगोडा येथील पाणीपुरवठा विहीरीच्या ठिकाणी तळ ठोकून आहेत.
पाणी टंचाई निवारणासाठी तात्काळ केलेल्या उपाययोजनांमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरवासीयांना अतिरिक्त पाणी देण्यात यश येत आहे. असा दावा नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केला आहे.
सटाणा शहराला ठेंगोडा येथिल गिरणा व शहराजवळील आरम नदीपात्रातील विहिरींवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत मात्र गिरणा व आरम नदीपात्र कोरडेठाक पडले असून पंचवीस ते तीस लाख लिटर गरज असलेल्या शहराला केवळ एक ते दीड लाख लिटर पाणी उपलब्ध होत आहे.त्यामुळे पाणीकपात करण्यात येत असून विरोधकांकडून मात्र त्याचे राजकीय भांडवल केले जात आहे.आम्ही मात्र या आरोप-प्रत्यारोपात वेळ घालवण्याऐवजी शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहोत असे नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे मागणी करण्यात आली.मात्र त्यास अवधी असल्याचे लक्षात येतात तातडीने पर्यायी उपाययोजना हाती घेण्यात आल्या.खरेतर शहराची वाढती लोकसंख्या बघता काही गोष्टी यापूर्वीच करणे गरजेचे होते.मात्र त्याकडे तत्कालीन सत्ताधार्यांनी दुर्लक्ष केले असले तरी आम्ही मात्र शहरवासीयांना पाणीटंचाईपासून मुक्त करण्यासाठी तातडीने पावले उचलली.शहराला पाणीपुरवठा करणार्या सर्वच विहिरींची खोली फक्त पन्नास फूट आहे. आजूबाजूच्या विहिरी शंभर फुटाच्या पुढे खोल असताना पालिका विहिरींची खोली कमी असल्याने जलस्रोत कमी आहे.त्यामुळे सर्वच विहिरीची खोली 50 ऐवजी 100 फूट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.शहरातील दर्गा विहिरीचे काम पूर्ण झाले आहे.ठेंगोडा नदीपात्रातील व शहरातील अमरधामजवळील विहिरीचे काम प्रत्यक्ष सुरू असूूून मळगाव बंधारा येथील गाळ काढण्याचें काम देखील आठ दिवसात सुरू होणार आहे यापुढील काळात पालिकेच्या जलस्रोतात भरभक्कम भर पडणार आहे.मळगाव बंधारा विहिरीवर ग्रामीण फिडर होते त्यामुळे कमी वीज पुरवठा होत होता.त्यामुळे पाण्याचा उपसा कमी होत होता, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून याठिकाणी शहरी फिडरचा वीजपुरवठा जोडण्यात यश आले असून त्यामुळे जास्तीत जास्त काळ वीजपुरवठा उपलब्ध होऊन पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.हातपंप दुरु स्तीसाठीसुद्धा पालिकेने नव्याने यंत्रणा सज्ज केली असून शहरातील सर्व नादुरु स्त हातपंप दुरु स्त करण्यात येत आहेत.नवीन हातपंप घेण्यासाठीसुद्धा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम चरणात पोहोचले असून लवकरच नवीन कूपनलिकांचे कामे हाती घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे शहरवासीयांना सद्यस्थितीत दिलासा देणे अधिक महत्त्वाचे असल्याने आपण स्वत: पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील,आरोग्य सभापती दीपक पाकळे, गटनेते राकेश खैरनार, काका सोनवणे,महेश देवरे,दत्तू बैताडे मुख्याधिकारी हेमलता डगळे,पाणीपुरवठा अभियंता राकेश उपावरा,सहाय्यक संजय सोनवणे,आनंदा पाटील, आण िसर्व अधिकारी कर्मचारी गेल्या पाच दिवसांपासून ठेंगोडा येथे तळ ठोकून आहोत.जेसीबी,पोकलांड यंत्रसामुग्रीचा वापर करून घेत युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत असून सेवाभावी शेतकरीवर्गा पर्यंत संपर्क साधून खाजगी विहिरींवरून पालिकेसाठी पाणी उपलब्ध करण्यात यश आले आहे.ठेंगोडा येथील दानशूर शेतकरी श्री सतीश देशमुख,सामाजिक कार्यकर्ते विलास दंडगव्हाळ,पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बागुल, केदा बाबूलाल बागुल, नारायण माधवराव निकम,प्रसिद्ध व्यापारी सतीश लुंकड,गटनेते काका सोनवणे,आदी शेतकरी वर्गाने पाणी दिले. याकामी मर्चंट बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अलई, राजेंद्रआबा येवला,नंदलाल हरी अिहरे, यांनी मोलाचे सहकार्य केले. शेतकरी वर्गाकडून त्यांच्या खाजगी विहिरीतील पाणी पालिकेतील जॉकवेल विहीरीला टाकण्यासाठी पालिकेच्या विहिरीपर्यंत तातडीने पाईपलाईन करण्यात आले असून सद्यस्थितीत चार विहिरीतून पालिकेच्या विहिरीत दिवसाकाठी लाखो लिटर पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शहरवासीयांना अतिरिक्त पाणी देण्यास सुरु वात झाली असून ऐन सणासुदीच्या काळात त्यामुळे शहरवासीयांची त्रेधातिरपीट निक्कच कमी करण्याचे प्रयत्न आहेत. खाजगी विहिरी वरून पाणी घेतल्याने गेल्या दोनच दिवसात जवळपास दररोज तीन लाख लिटर पाणी उपलब्ध होऊ लागले असून येत्या दिवसात पाच ते दहा लाख लिटर पाणी उपलब्ध होऊन पाणी कपात कमी करण्यात येणार आहे असेही नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले.
नगराध्यक्ष, सभापतींची भोजनही नदीपात्रात!
ठेंगोडा नदीपात्रातील खाजगी विहीर मालकांचे मनधरणी करून त्यांचे पाणी पालिकेच्या विहिरीत टाकून शहरासाठी अधिकाधिक पाणी उपलब्ध करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे, सभापती,गटनेते,नगरसेवक तसेच अधिकारी आण िकर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्नाला लागले आहेत. ही सर्व मंडळी गेल्या पाच दिवसांपासून ठेंगोडा येथील नदीपात्रात तळ ठोकून आहेत.खास बाब म्हणजे नगराध्यक्षांसह इतर पदाधिकार्यांचे जेवणाचे डबेही घरून नदीपात्रात येत असून सर्व त्याच ठिकाणी जेवण करून लगेच कामाला लागत आहेत अविश्रांत केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरासाठीच्या पाणीसाठ्यात दुप्पट वाढ झाली असून ऐन दिवाळीत यामुळे महिलावर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

Web Title: To remove the water scarcity, place the base in the city of Cambodia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.