जेलरोडला क्रीडा संकुलाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:28 AM2019-01-12T00:28:24+5:302019-01-12T00:29:23+5:30

जेलरोड आढाव मळा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल लोकार्पण सोहळा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

Release of Sports Complex to Jail Road | जेलरोडला क्रीडा संकुलाचे लोकार्पण

जेलरोड येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल लोकार्पण करतांना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे. समवेत सहकारमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर, प्रशांत दिवे, मंगला आढाव, भाऊलाल चौधरी, सुधाकर बडगुजर आदि.

Next
ठळक मुद्देशिवाजी महाराजांचे नाव : आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सोहळा

नाशिकरोड : जेलरोड आढाव मळा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल लोकार्पण सोहळा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
जेलरोड आढावनगर येथे मनपाने खेळासाठी आरक्षित केलेल्या जागेवर विविध खेळांचे इनडोअर स्टेडियम उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत ६ कोटी व मनपाने ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. दोन-अडीच वर्षांपूर्वी भूमिपूजन झाल्यानंतर इनडोअर स्टेडियमचे काम पूर्ण झाले. शुक्रवारी दुपारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कोनशीलेचे अनावरण करून इनडोअर स्टेडियमचे लोकार्पण करण्यात आले.
ठाकरे यांचे स्वागत प्रभागच्या नगरसेविका मंगला आढाव, नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केले. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख भाऊलाल चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, प्रभाग सभापती पंडित आवारे, सचिन मराठे, महेश बडवे, राजू लवटे, सत्यभामा गाडेकर आदिंसह नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक, रहिवासी उपस्थित होते. सर्व परिसर भगवामय करण्यात आला होता.
विविध विद्यार्थी उपस्थित
इनडोअर स्टेडियममध्ये विविध शाळांचे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. स्टेडियमच्या मध्यभागी उभारलेल्या व्यासपीठावर विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे देण्यात येत होते. यावेळी ठाकरे यांनी विद्यार्थिनींना आग लागली, आपत्कालीन परिस्थितीत स्वत: सोबत इतरांचा जीव कसा वाचवायचा, टवाळखोर, छेडछाड करणाऱ्यांना धडा कसा शिकवायचा, स्वत:चे संरक्षण कसे करायचे याबाबत हितगूज केले. ठाकरे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन सेल्फी काढू लागताच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

Web Title: Release of Sports Complex to Jail Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.