शिक्षक मतदारसंघासाठी २९ हजार अर्जांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:39 AM2017-11-07T00:39:38+5:302017-11-07T00:43:50+5:30

जुलै महिन्यात मुदत संपणाºया विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीला सुरुवात झालेली असली तरी, त्याला शिक्षकांचा पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या निवडणुकीसाठी जोपर्यंत उमेदवारांची निश्चिती होत नाही तोपर्यंत शिक्षक मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचा आजवरचा अनुभव असल्याने निवडणूक आयोगाने ६ नोव्हेंबरपर्यंत होणाºया मतदार नोंदणीची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्याचे ठरविले असले तरी, ही यादी अवघ्या २६ हजार मतदारांपुरतीच मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत.

 Registration of 29 thousand applications for teacher constituency | शिक्षक मतदारसंघासाठी २९ हजार अर्जांची नोंदणी

शिक्षक मतदारसंघासाठी २९ हजार अर्जांची नोंदणी

Next

नाशिक : जुलै महिन्यात मुदत संपणाºया विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीला सुरुवात झालेली असली तरी, त्याला शिक्षकांचा पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या निवडणुकीसाठी जोपर्यंत उमेदवारांची निश्चिती होत नाही तोपर्यंत शिक्षक मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचा आजवरचा अनुभव असल्याने निवडणूक आयोगाने ६ नोव्हेंबरपर्यंत होणाºया मतदार नोंदणीची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्याचे ठरविले असले तरी, ही यादी अवघ्या २६ हजार मतदारांपुरतीच मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत.  निवडणूक आयोगाने २८ सप्टेंबरपासून विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वी या मतदारसंघाची यादी रद्द ठरविण्यात आली असून, नवीन मतदारांची नोंदणी करूनच यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक शाखेने सर्व महाविद्यालये, शाळा, शिक्षण संस्थाचालकांची बैठक घेऊन त्यांना शिक्षकांची मतदार नोंदणी करून घेण्याचे आवाहन करतानाच मतदार नोंदणीचे अर्जदेखील उपलब्ध करून दिले होते. ६ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी होणाºया मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या.  या मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळण्यासाठी निवडणूक शाखेमार्फत प्रयत्न केले जात असून, २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या महिनाभराच्या कालावधीत शिक्षक मतदारांची नोंदणी करता येईल व त्यानंतर ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, या यादीच्या आधारेच म्हणजेच ज्यांची यादीत नावे आहेत अशांनाच या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. गेल्या सहा वर्षांपूर्वी नाशिक विभागातून ५४,०५६ इतक्या मतदारांची नोंदणी झाली होती. त्यामानाने यंदा हे प्रमाण तूर्त कमी दिसत आहे. 
प्रतिसाद कमी 
नाशिक विभागातून शिक्षक मतदार नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. विभागातून २६,०४६ इतक्या मतदारांची नोंदणी सोमवारअखेर झाली आहे. त्यात पुरुष शिक्षकांची संख्या २२,७६० इतकी, तर महिला शिक्षकांची संख्या ६५३० इतकी आहे. या मतदार नोंदणीत अहमदनगर व जळगावने आघाडी घेतली असून, तेथे अनुक्रमे ९०३५ व ६६२१ इतक्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. नाशिकमध्ये ५३४५, धुळे ४४६५ व नंदुरबार ३८६३ मतदारांनी नोंदणी केली आहे.

Web Title:  Registration of 29 thousand applications for teacher constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.