सोमवारपासून रेल्वे देणार तिकीटाचा परतावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 06:02 PM2020-05-23T18:02:09+5:302020-05-23T18:04:47+5:30
कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या भारतीय रेल्वेने येत्या एक जूनपासून देशात दोनशे श्रमिक रेल्वे चालविण्याचा निर्णय घेवून त्यासाठी आगावू तिकीट बुकींग सुरू केले असून, त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष रेल्वेमध्ये फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच प्रवास करता येणार असून, त्यातही फक्त परप्रांतिय प्रवाशीच प्रवास करू शकतील. या निमित्ताने रेल्वे आपल्या प्रवाशी वाहतुकीला प्रारंभ करीत असून, त्याच बरोबर दोन महिन्यांपुर्वी तिकीट आरक्षित केलेल्या परंतु रेल्वे रद्द झाल्याने प्रवास न करू शकलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे सोमवारपासून परत करण्यासही सुरूवात होत आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात आरक्षण तिकिटाची रक्कम जमा केली आहे. मात्र ज्या प्रवाशांनी आरक्षण केंद्राच्या खिडकी वरून प्रत्यक्ष आरक्षण तिकीट घेतले होते, त्या प्रवाशांना येत्या सोमवार (दि. २५)पासून आरक्षण तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड देण्यात येणार आहे. मात्र रिफंड घेण्यासाठी प्रवाशांनी एकाच वेळी मोठी गर्दी करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरक्षण रिफंड देण्याचे काम दररोज सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी खबरदारी घेऊन रिफंड घेण्यास यावे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोविड स्पेशल रेल्वेचे आरक्षण तिकिटाचा कालावधी हा ३० दिवसासाठी आहे. संबंधित रेल्वेचे आरक्षण तिकीट हे वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्या प्रवाशाला रेल्वेमध्ये जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे संबंधित रेल्वे प्रवाशाने रेल्वे सुरू होण्यापूर्वीच आपले वेटिंग लिस्टमध्ये असलेले आरक्षण रद्द करून रिफंड घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मात्र प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करण्यास गेल्यावर त्यांना रिफंड मिळणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आॅनलाइन आरक्षण तिकीट घेतलेल्या प्रवाशाचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्याने सुद्धा गाडी सुरू होण्यापूर्वीच आपले आरक्षण तिकीट रद्द करणे गरजेचे असल्याचे रेल्वेने कळविले आहे.