शहरात घोंगावले ‘लाल वादळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:00 AM2019-02-21T01:00:24+5:302019-02-21T01:01:01+5:30

‘जय जवान, जय किसान’, ‘फडणवीस सरकार होश में आओ...’, ‘होश में आकर बात करो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं...’ अशा घोषणांनी बुधवारी (दि.२०) शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर लाल टोपी अन् गळ्यात किसान सभेची मफलर घेत मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासींचे जत्थे राज्यातील विविध शहरांमधून पुण्यनगरी नाशिकमध्ये दाखल झाल्याने शहरावर ‘लाल वादळ’ घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 'Red storm' in city | शहरात घोंगावले ‘लाल वादळ’

शहरात घोंगावले ‘लाल वादळ’

googlenewsNext

नाशिक : ‘जय जवान, जय किसान’, ‘फडणवीस सरकार होश में आओ...’, ‘होश में आकर बात करो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘सरकार हमसे डरती हैं, पुलीस को आगे करती हैं...’ अशा घोषणांनी बुधवारी (दि.२०) शहर दणाणले होते. हातात लाल बावटा, डोक्यावर लाल टोपी अन् गळ्यात किसान सभेची मफलर घेत मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासींचे जत्थे राज्यातील विविध शहरांमधून पुण्यनगरी नाशिकमध्ये दाखल झाल्याने शहरावर ‘लाल वादळ’ घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले.
अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य परिषदेने नाशिक-मुंबई अशी लांब पदयात्रा जाहीर केल्याने यासाठी राज्यातील आदिवासी महिला-पुरुष बिºहाडासह शहरात धडकले. हजारो मोर्चेकऱ्यांना एकत्र जमण्यासाठी मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक रिकामे करून देण्यात आले होते. दुपारी बारा वाजेपासून मोर्चेकºयांचे जत्थे येण्यास सुरुवात झाली. हातात लाल बावटे घेऊन मोर्चेकरी महामार्ग बसस्थानकात दाखल होत होते. दुपारी ४ वाजता ‘लॉँग मार्च’ शहरातून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल, असे ठरले होते. मात्र रात्री बसस्थानकातच मुक्काम करण्याचे निश्चित झाले़ जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चर्चेसाठी किसान सभेच्या नेत्यांना शासकीय विश्रामगृहावर बोलविले होते. या चर्चेतून ते सरकारच्या वतीने शेतकºयांच्या अमान्य मागण्यांवर तोडगा काढणार होते.
डॉ. अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या ‘लॉँग मार्च’साठी राज्यभरातून किसान सभेचे कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
चटणी, भाकर अन् ठेचा...
दुपारी बारा वाजेपासून पोहचलेल्या मोर्चेकºयांनी सोबत बांधून आणलेली शिदोरी उघडत चटणी, भाकर अन् ठेचावर ताव मारत भूक भागविली. यावेळी काही मोर्चेकरी महिलांनी हातात धरलेले रेशन मागणीच्या फलकांनी लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ महिला, पुरुषांनी चक्क चटणी-भाकर खाऊन मोर्चात सहभागी होण्याचा केलेला निर्धार सरकारविरोधी एल्गार दाखविणारा ठरला.
गिरीश महाजन हेलिकॉप्टरने दाखल
किसान सभेचा मोर्चा नाशिक-मुंबई असा जाणार असल्याचे समजल्यानंतर सरकारकडून चर्चेसाठी तत्काळ हेलिकॉप्टरने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी येथील अधिकाºयांसोबत आढावा बैठक घेत जिल्ह्यातील मोर्चेकºयांची स्थिती जाणून घेतली. रात्री दहा वाजता त्यांनी किसानसभेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू केली.
मुंबई नाक्यावरील वाहतूक विस्कळीत
४संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ईदगाह मैदानाकडून आलेल्या मोर्चेकºयांच्या मोठ्या जत्थ्याने अचानकपणे महामार्ग बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मुंबई नाका पोलीस ठाण्याशेजारी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबई नाका चौकात काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. मोर्चेकºयांनी सुमारे अर्धा तास ठिय्या देत सरकारच्या विरोधी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

Web Title:  'Red storm' in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.