गांधीजींच्या चष्म्याच्या प्रतिकृतीचा रेकॉर्ड इंडियन बुक आॅफ रेकॉर्ड : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:35 AM2017-12-17T01:35:19+5:302017-12-17T01:35:52+5:30

नाशिक शहर कॉँग्रेस दलाच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी अर्थात २ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांच्या चष्म्याची ७ बाय ९ अशा भव्य आकारात केलेल्या प्रतिकृतीची इंडियन बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व मानचिन्ह नुकतेच नाशिक शहर कॉँग्रेस सेवादल शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना देण्यात आले.

Record of Gandhiji's specimen's record Indian Book of Records: Nashik | गांधीजींच्या चष्म्याच्या प्रतिकृतीचा रेकॉर्ड इंडियन बुक आॅफ रेकॉर्ड : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

गांधीजींच्या चष्म्याच्या प्रतिकृतीचा रेकॉर्ड इंडियन बुक आॅफ रेकॉर्ड : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next
ठळक मुद्देकॉँग्रेस सेवादलातर्फे चष्म्याची प्रतिकृतीअहिंसेचा संदेश त्यांना समजावा

नाशिक : नाशिक शहर कॉँग्रेस दलाच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी अर्थात २ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांच्या चष्म्याची ७ बाय ९ अशा भव्य आकारात केलेल्या प्रतिकृतीची इंडियन बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व मानचिन्ह नुकतेच नाशिक शहर कॉँग्रेस सेवादल शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना देण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या विक्रमामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेल्या लढ्याची पुढील पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने कॉँग्रेस सेवादलातर्फे चष्म्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. आजच्या तरुण पिढीपर्यंत महात्मा गांधी यांचे विचार पोहोचावेत तसेच अहिंसेचा संदेश त्यांना समजावा या हेतूने हा चष्मा तयार करण्यात आला होता. गांधी जयंतीचे औचित्य साधत शहरातील कॉँग्रेस भवन येथे ठेवण्यात आलेला हा भव्य चष्मा बघण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. गांधीजींच्या विचारांचा संदेश देणाºया या विक्रमाची इंडियन बुक आॅफ वर्ल्ड रकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.१५) वसंत ठाकूर यांना याबाबतचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह मिळाले. या विक्रमाबाबत नाशिककरांकडून त्यांचे विशेष स्वागत करण्यात येत आहे.

Web Title: Record of Gandhiji's specimen's record Indian Book of Records: Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.