‘सूरविश्वास’ मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:39 AM2019-04-21T00:39:22+5:302019-04-21T00:39:38+5:30

सूर-तालची मधुर बरसात घेऊन रम्य सकाळ ख्याल गायकी, बंदीश, गजल, अशा विविध रूपांनी बरसत होती व रसिकांना अवीट, अभिजात आनंद देत होती. स्वरांतून निथळणारा आशय, शब्दसाज लेऊन स्वराभिषेकच करत होता.

 Rasik mesmerized in 'Survishas' concert | ‘सूरविश्वास’ मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

‘सूरविश्वास’ मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

Next

नाशिक : सूर-तालची मधुर बरसात घेऊन रम्य सकाळ ख्याल गायकी, बंदीश, गजल, अशा विविध रूपांनी बरसत होती व रसिकांना अवीट, अभिजात आनंद देत होती. स्वरांतून निथळणारा आशय, शब्दसाज लेऊन स्वराभिषेकच करत होता. ‘सूर विश्वास’ उपक्र माचे तृतीय पुष्प आनंद अत्रे यांनी गुंफले.
आनंद अत्रे यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने मैफलीत उत्साह निर्माण केला. मैफलीची सुरुवात अहिर भैरव रागातील बडा ख्यालाने केली. शब्द होते ‘हो करतार’. मैफलीला साथसंगत हर्षद वडजे (हार्मोनियम), रोहित नागरे (तबला) यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. ध्वनी व्यवस्था पराग जोशी यांची होती. विश्वास ग्रुपतर्फे ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन क्लब हाउस येथे करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विश्वास ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्र म संपन्न झाला. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्र माचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. कार्यक्र मास अनिल लाड, डॉ. मनोज शिंपी, अमर भागवत, डॉ. हरी कुलकर्णी, अमित शहा, संजय परांजपे, सतीश गायधनी, मिलिंद धटिंगण, शरद पटवा, विनय अंधारे, प्रसाद देशपांडे, प्रिया तुळजापूरकर, बाळ नगरकर, राजा पाटेकर, रवींद्र कट्यारे, चंद्रशेखर ओढेकर, संजीव गावणेकर, सोमनाथ गायकवाड, नेहा देशपांडे, उर्मिला झनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
छोटा ख्यालात ‘अलबेला साजन आयो री’ या शास्त्रीय गायनानंतर नाट्यगीताने रंग भरला, शब्द होते ‘या भवनातील गीत पुराने’ नाट्यसंगीत पर्वातील एका युगाचीच त्यांनी आठवण करून दिली. ‘रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिए आ’, त्यानंतर ‘काश ऐसा कोई मंजर होता मेरे काँधे पे तेरा सर होता’ अशा गजलांतून भाषेची नजाकत आणि गायकीची प्रचिती दिली.

Web Title:  Rasik mesmerized in 'Survishas' concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.