राष्टवादीच्या शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची फेरनियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:50 AM2018-10-24T00:50:53+5:302018-10-24T00:51:12+5:30

गेल्या पाच महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची फेरनियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने यासंदर्भात होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, अखेर पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे यांच्या पारड्यातच आपला कौल दिला आहे.

 Ranjan Thackeray's appointment as President of Nationalist Congress Party | राष्टवादीच्या शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची फेरनियुक्ती

राष्टवादीच्या शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची फेरनियुक्ती

Next

नाशिक : गेल्या पाच महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची फेरनियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने यासंदर्भात होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, अखेर पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे यांच्या पारड्यातच आपला कौल दिला आहे.  राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही पक्षश्रेष्ठींकडून नाशिक शहर अध्यक्षपदाचे नाव घोषित केले जात नव्हते. या पदासाठी अनेक इच्छुक असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात पक्षांतर्गत निवडणुकीत शहरातील ब्लॉक अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून प्रदेश अध्यक्षांकडे रंजन ठाकरे यांच्या एकमेव नावाची शिफारस करण्यात आली होती. याउपरही प्रदेशाध्यक्षांना सर्व अधिकार देण्याचा ठरावही पाठविण्यात आला होता. पक्षांतर्गत या सर्व घडामोडी होत असतानाच जिल्ह्याचे नेते छगन भुजबळ यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पक्षाची सारी सूत्रे भुजबळ यांच्याकडेच सोपविण्यात आली. त्यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांच्या नेमणुकीत भुजबळ यांचा हस्तक्षेप व सामाजिक, भौगोलिक रचनेनुसार नियुक्त्या करण्यात आल्या. परंतु नाशिक शहराध्यक्ष जाहीर केले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, ठाकरे यांनी पक्षाचे कार्य सुरूच ठेवल्याने अखेर त्यांना कौल देण्यात आला आहे.
दुस-यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी
मंगळवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रंजन ठाकरे यांची नाशिक शहर-जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती केल्याचे पत्र पाठविले आहे. दोन वर्षांपूर्वी पक्षाची सैरभैर अवस्था असताना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांच्यावर पक्षाने अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. आता पुन्हा दुसºयांदा शहराध्यक्ष होण्याची संधी दिवंगत डॉ. वसंत पवार यांच्यानंतर रंजन ठाकरे यांना मिळाली आहे.

Web Title:  Ranjan Thackeray's appointment as President of Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.