राज्य आदर्श शिक्षक समितीच्या कार्याध्यक्षपदी रामदास सांगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 07:00 PM2019-07-09T19:00:42+5:302019-07-09T19:01:00+5:30

सिन्नर : महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी सिन्नर येथील साने गुरूजी शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक रामदास सांगळे यांची तर सहचिटणीसपदी उत्तम पवार यांची निवड करण्यात आली आहे. बीड येथे झालेल्या आदर्श शिक्षक समितीच्या मेळाव्यात राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या दोघांनाही नियुक्तिपत्र देण्यात आले.

 Ramdas Sangale is the working president of the State Adarsh Teachers Committee | राज्य आदर्श शिक्षक समितीच्या कार्याध्यक्षपदी रामदास सांगळे

राज्य आदर्श शिक्षक समितीच्या कार्याध्यक्षपदी रामदास सांगळे

googlenewsNext

मेळाव्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ३०१ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर १४ शाळांचा उपक्रमशील शाळा म्हणून गौरव करण्यात आला. याप्रसंगी आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे, राज्य अध्यक्ष अंकुश काळे, डॉ. भागवत कराड, बीडचे नगराध्यक्ष भूषण क्षीरसागर, महिला आघाडीच्या राज्यप्रमुख मुक्ता पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील बाळासाहेब सानप, विजय चकोर, बाळासाहेब शेळके, सुनील गिते, रामदास कवटे, दशरथ शिंदे, एकनाथ घुले, सुनील गिते, रवींद्र सातव, संदीप सानप, अविनाश खेडकर, रामदास घुगे, सोमनाथ पथवे, सोमनाथ आव्हाड, शांताराम आव्हाड, संदीप लेंडे, प्रशांत हेकरे, धनंजय सूर्यवंशी, गोरक्ष गोर्डे, राजू सानप, नितीन घोडके, ज्ञानेश्वर दराडे, संतोष देशमुख, अण्णासाहेब सांगळे, संजय बोडके, ज्ञानेश्वर सानप, विनायक सानप, गणेश भाबड, पांडुरंग कडाळी, खंडू आव्हाड, दीपक उगले आदी उपस्थित होते.

Web Title:  Ramdas Sangale is the working president of the State Adarsh Teachers Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक