नाशकात पुन्हा पावसाळा, पुन्हा स्वाईन फ्ल्यू डेंग्यू!

By संजय पाठक | Published: July 13, 2019 11:31 PM2019-07-13T23:31:29+5:302019-07-13T23:34:00+5:30

नाशिक- सण आणि उत्सव जशी या देशाची आणि समाजाची परंपरा आहे, तशीच नाशिक शहराला एक शहर म्हणून देखील परंपरा आहे. शहरात पावसाळ्या आला की पुन्हा स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यु सारखे जोड साथीचे रोग येतात. त्यातून शेकडोंना लागण काहींचा मृत्यू मग नागरीकांचा महापालिकेवर आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर रोष, तेच ते इशारे हे सर्व परंपरेने चालत आले आहे. २०१९ हे वर्ष तरी त्याला अपवाद कसे असणार?

Rains again in the Nashik, again swine flu dengue! | नाशकात पुन्हा पावसाळा, पुन्हा स्वाईन फ्ल्यू डेंग्यू!

नाशकात पुन्हा पावसाळा, पुन्हा स्वाईन फ्ल्यू डेंग्यू!

Next
ठळक मुद्देरोगांची परंपरा आणि उपचाराचीहीमहापालिकेत बैठकीची केवळ औपचारीकताच

संजय पाठक, नाशिक- सण आणि उत्सव जशी या देशाची आणि समाजाची परंपरा आहे, तशीच नाशिक शहराला एक शहर म्हणून देखील परंपरा आहे. शहरात पावसाळ्या आला की पुन्हा स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यु सारखे जोड साथीचे रोग येतात. त्यातून शेकडोंना लागण काहींचा मृत्यू मग नागरीकांचा महापालिकेवर आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर रोष, तेच ते इशारे हे सर्व परंपरेने चालत आले आहे. २०१९ हे वर्ष तरी त्याला अपवाद कसे असणार?
आला पावसाळा, तब्येत सांभाळा असे नेहेमीच सांगितले जाते. पावसाळा नियंत्रणात नाही मात्र रोगराईतर असू शकते. परंतु तसे होत नाही. नाशिक शहरात पावसाळा आला म्हंटला की, लगेचत एक वर्षे स्वाईन फ्ल्यु तर एक वर्ष डेंग्यु अशी वर्षाआड येण्याची परंपरा आहे. डेंग्यू रूग्णांची संख्या ही आत्तापर्यंत मर्यादीत असून अवघे २०-२२ रूग्ण आहेत. परंतु यंदा स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले आहे. गेल्यावर्षी जानेवारीपासून जुलैपर्यंत जेमतेम एक रूग्ण होता. व त्याचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र जानेवारीपासूनच स्वाईन फ्ल्यूच्या उपसर्गाला सुरूवात झाली. आता जुलैपर्यंत ही संख्या दीडशे पर्यंत पोहोचली असून दहा जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात बळींची हीच संख्या ३५ वर असून राज्यात ती सर्वाधिक अधिक असल्याने यंदा मात्र शासकिय यंत्रणांची धावपळ उडाली. आरोग्य खात्याच्या साथ रोग नियंत्रण अधिकाºयांनी नाशिकमध्ये धाव घेतली. शासकिय वैद्यकिय अधिकारी आणि खासगी वैद्यकिय व्यवसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांना देखील प्रशिक्षण दिले. अर्थातच रोग नियंत्रण हातात नाही, अशी स्पष्ट कबुली देताना मृत्यू कमीत कमी होतील म्हणजेच माणसाचे जीव कसा वाचेल यावर त्यांनी अधिक भर दिला. अर्थात, हे व्यवहार्य म्हणावे लागेल. रोगाचे विषाणु दरवर्षी बदलत जातात त्यामुळे रोगप्रतिबंधात्मक म्काम आव्हानात्मक असते हे खरे असले तरी नाशिकच संवेदनशील का याबाबत देखील विश्लेषण झाले पाहिजे.
अर्थात, शासकिय स्तरावर रोगराईसंदर्भात काही तरी गांर्भिय आढळले. नाशिक महापालिकेत मात्र कोणत्याही प्रकारचे गांभिर्य नाही, असे दिसले. महापौरांनी एक बैठक घ्यायची अधिकाºयांना सर्व गटनेत्यांनी घेरायचे आणि मग त्यांचे प्रत्येक दावे चुकीचे ठरवत झाडाझडती घ्यायची ही देखील महापालिकेची परंपराच ठरत आहे. त्यानुसार यंदाही ती यथा सांग पार पडली. पेस्ट कंट्रोल आणि घंटागाडीचे ठेकेदार काय करतात, मग त्यांच्यावर कारवाई काय झाली, त्यांच्यावर कारवाई करीत नसाल तर मग तुमच्यावर कारवाई करू का या सारखे प्रश्न केल्यानंतर अखेरीस महापौरांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश द्यायचे त्यांच्या अंमलबजावणीचे अहवाल मागवायचा, मग बैठक संपली. नंतर आराखडा होत नाही आणि अहवाल देखील दिला जात नाही. रोगराई होऊ नये याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही नाही की उपाययोजना नाही. झाडा झडती हेच उद्दीष्ट! ते साध्य झाले की, काहीही मग प्रशासन नाकर्ते त्यांची अगोदरच झाडाझडती घेतली होती. यंदाही महापालिकेत ही बैठकीची परंपरा पार पडली.
अर्थात, सर्व सामान्य कष्टकरी वर्ग वगळला तर सजग वर्ग हा महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर कधीच अवलंबून नसतो. तो केवळ सार्वजनिक स्वच्छतेची अपेक्षा बाळगून असतो. तेवढी झाली तरी खूप असते. परंतु तेही होत नसेल तर तो महापालिका ही पालक संस्था असून त्याकडे नकारात्मक दृष्टीनेच पाहतो. आणि त्यामुळेच महापालिकेला शिव्यांची लाखोलीही वाहतो अर्थात ही देखील ‘परंपराच’!

 

 

Web Title: Rains again in the Nashik, again swine flu dengue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.