पुंडलिक बागुल सक्तीच्या रजेवर?

By admin | Published: August 10, 2015 11:12 PM2015-08-10T23:12:03+5:302015-08-10T23:12:25+5:30

सीईओंच्या सूचना

Pundalik Bagul on forced leave? | पुंडलिक बागुल सक्तीच्या रजेवर?

पुंडलिक बागुल सक्तीच्या रजेवर?

Next

नाशिक : पाच हजार रुपयांच्या लाच प्रकरणात संशयित असलेले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुंडलिक बागुल यांना प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे लाच प्रकरणातून बाहेर येईपर्यंत नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी सेवेत रुजू होऊ नये, असे प्रशासनाचे मत होते. तर मागील आठवड्यात दोन दिवस डॉ. पुंडलिक बागुल जिल्हा परिषदेत रजेचा कालावधी संपल्याने रुजू झाले होते. मात्र सोमावर (दि. १०) पासून डॉ. पुंडलिक बागुल पुन्हा रजेवर गेले असून, त्यांच्या पदाचा भार पशुधन अधिकारी डॉ. आर. बी. चोपडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मखमलाबाद येथील एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून बदली न करण्याच्या कारणावरून पाच हजार रुपयांची लाच मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. पुंडलिक बागुल यांना त्यांच्या म्हसरूळ येथील राहत्या घरातून लाचेच्या पैशासह ताब्यात घेतल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर डॉ. पुंडलिक बागुल यांच्या पदाची सूत्रे डॉ. आर. बी. चोपडे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र ५ आॅगस्टपर्यंत डॉ. पुंडलिक बागुल यांची अधिकृत रजा असल्याने त्यांनी ६ आॅगस्ट रोजी पुन्हा पदाची सूत्रे स्वीकारत कारभार सुरू केला होता. मात्र याची कुणकुण प्रशासनाला लागल्याने आणि मंगळवारी (दि.११) जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असल्याने प्रशासनाने डॉ. पुंडलिक बागुल यांच्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता पाहून त्यांना रजेवर जाण्याची सूचना केल्याचे समजते. मात्र त्यास दुजोरा मिळू शकलेला नाही. यातही प्रशासनाने डॉ. पुंडलिक बागुल यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याने आता त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची बदली होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Pundalik Bagul on forced leave?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.