नवज्योत सिद्धू यांचा भाजपातर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:15 AM2018-08-23T01:15:59+5:302018-08-23T01:17:03+5:30

पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला गेले असताना पाकिस्तानच्या लष्करप्रमुख कमार बाजवा यांची गळा भेट घेऊन भारतीयांचा अवमान केल्याने त्याचा पंचवटी भाजयुमोच्या वतीने निषेध करण्यात आला.

Prohibition by Navjyot Sidhu's BJP | नवज्योत सिद्धू यांचा भाजपातर्फे निषेध

नवज्योत सिद्धू यांचा भाजपातर्फे निषेध

googlenewsNext

पंचवटी : पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला गेले असताना पाकिस्तानच्या लष्करप्रमुख कमार बाजवा यांची गळा भेट घेऊन भारतीयांचा अवमान केल्याने त्याचा पंचवटी भाजयुमोच्या वतीने निषेध करण्यात आला. बुधवारी सकाळी पंचवटी कारंजा येथे सिद्धू यांच्या विरोधात घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.  सिद्धू यांना पाकिस्तानने सन्मानपूर्वक बोलवले असते तर तेथे जाण्यास कुठलीही हरकत नव्हती. आतंकवादामुळे भारत व पाकिस्तान यांच्यातील सर्व चर्चा बंद असताना अशाप्रकारे स्वत:हून गळा भेट घेऊन सिद्धू यांनी तमाम भारतीयांचा अवमान केला. एकीकडे सीमेवर देशाच्या रक्षणासाठी भारतीय सैनिक शहीद होत असताना सिद्धू यांचे कृत्य निंदनीय असून, सैनिकांचा अपमान करणारे आहे. सिद्धू यांनी घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करून भारताची व सैनिकांची माफी मागावी, अशी मागणी भाजयुमो महानगरच्या वतीने करण्यात आली. यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष अजिंक्य साने, शहर सरचिटणीस अमित घुगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो आरवर २२ भाजप नावाने)

Web Title: Prohibition by Navjyot Sidhu's BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा