विलंबाच्या प्रवेशामुळे परीक्षेचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:09 AM2017-10-31T00:09:04+5:302017-10-31T00:09:19+5:30

लांबलेल्या प्रवेशफेºयांमुळे अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अपुºया अभ्यासावरच परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबत काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी थेट कबुली दिली असून, प्रवेशप्रक्रियेला दोष दिला आहे.

 Problems with the entrance of the delay | विलंबाच्या प्रवेशामुळे परीक्षेचा घोळ

विलंबाच्या प्रवेशामुळे परीक्षेचा घोळ

Next

नाशिक : लांबलेल्या प्रवेशफेºयांमुळे अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अपुºया अभ्यासावरच परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबत काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी थेट कबुली दिली असून, प्रवेशप्रक्रियेला दोष दिला आहे. नाशिक महानगरपालिका व देवळाली कॅम्प परिसरातील एकूण ५७ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सुरू राहिली. या कालावधीत एकूण नऊ फेºया घेण्यात आल्या असून, शहरातील एकूण उपलब्ध २४ हजार ७५० जागांपैकी २२ हजार ३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशप्र्रक्रिया पूर्ण केली, तर विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये २ हजार ७१७ जागा रिक्त राहिल्या. जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया सुरू राहूनही रिक्त जागा हजारोंच्या संख्येत आहे.  प्रवेशासाठी इच्छुक एकही विद्यार्थी प्रवेशापासूून वंचित राहू नये, ही भूमिका घेऊन समितीकडून प्रक्रिया लांबविण्यात आली असताना अकरावीचे वर्ग आॅगस्टपासूनच सुरू झाले, तोपर्यंत केवळ पहिल्या तीन फेºयांमध्ये १५ हजार ११८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यात बहुतेक नामांकित आणि मोठ्या महाविद्यालयांची संख्या अधिक होती. या प्रक्रियेतील नियमित चौथी फेरी आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात संपली. त्यानंतर दोन विशेष फेºया व प्रथम येणाºयास, प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार तीन फेºया घेण्यात आल्या. सहावी फेरी आॅगस्टपर्यंत सुरू राहिली. त्यानंतर प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महाविद्यालयांनीच या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग घेण्याचे फर्मान समितीने सोडले होते; पण अनेक महाविद्यालयांना जादा वर्ग घेणे शक्य झालेले नसल्याचे समोर आले आहे.
अभ्यासक्रमाला मुक ले विद्यार्थी 
अकरावीच्या केंद्रीय आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थ्यांचे सप्टेंबर महिन्यात प्रवेश झाले. या विद्यार्थ्यांना आॅगस्ट महिन्यातील शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमाला मुकावे लागले. शिक्षण उपसंचालकांनी यासंबंधी महाविद्यालयांनी जादा वर्ग घेण्याचे निर्देश दिले खरे, परंतु प्रत्यक्षात हे वर्ग होत आहेत की नाही यावर कोणत्याही यंत्रणेने लक्षच दिले नाही. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांमध्ये उशिरा प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

Web Title:  Problems with the entrance of the delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.