नामकोच्या निवडणुकीत  बागमार समर्थकांचे ‘प्रगती’ पॅनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:43 AM2018-11-15T00:43:02+5:302018-11-15T00:43:17+5:30

नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीची तारीख घोषित होत नाही तोच प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे सर्वेसर्वा असलेल्या हुकूमचंद बागमार यांच्या समर्थक माजी संचालकांच्या पॅनलला नम्रता नाव वापरण्यास हुकूमचंद यांचे पुत्र अजित बागमार यांनी विरोध केला

 'Pragati' panel of Baghara supporters in Nomko's election | नामकोच्या निवडणुकीत  बागमार समर्थकांचे ‘प्रगती’ पॅनल

नामकोच्या निवडणुकीत  बागमार समर्थकांचे ‘प्रगती’ पॅनल

googlenewsNext

नाशिक : नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीची तारीख घोषित होत नाही तोच प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे बॅँकेचे सर्वेसर्वा असलेल्या हुकूमचंद बागमार यांच्या समर्थक माजी संचालकांच्या पॅनलला नम्रता नाव वापरण्यास हुकूमचंद यांचे पुत्र अजित बागमार यांनी विरोध केला असून, त्यामुळे गिते- साने- भंडारी यांच्या पॅनलने प्रगती नाव घेतले आहे. या निवडणुकीत शेलार यांच्या पॅनलसह आता तीन पॅनल रिंगणात असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१ लाख ८६ हजार सभासद असलेल्या नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेची निवडणूक २३ डिसेंबर रोजी होणार असून, त्यासाठी येत्या १९ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. बॅँकेचे सर्वेसर्वा असलेल्या (कै.) हुकूमचंद बागमार यांचे नम्रता तर ललित मोदी- गजानन शेलार यांच्या सहकार पॅनलमध्ये आजवर लढत बघायला मिळत होती. चाळीस वर्षांपासून हुकूमचंद बागमार हे नम्रता पॅनल नावाने निवडणूक लढवित होते. त्यांच्या पश्चात मात्र बागमार यांच्या पॅनलमधून निवडणूक लढविताना नम्रता पॅनलचे नाव वापरण्यास अजित बागमार यांनी आक्षेप घेतला आहे. हुकूमचंद बागमार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्याचा अधिकार केवळ हुकूमचंद बागमार यांचे सुपुत्र म्हणून आपल्यालाच असल्याने कोणालाही नम्रता नाव घेऊ दिले नाही, असे अजित बागमार यांनी सांगितले.
सुरुवातीला अजित बागमार यांच्या पॅनलविषयी शंका असताना आता त्यांनी ५७ इच्छुकांची यादी तयार केली आहे. त्यातील २१ उमेदवारांची नावे गुरुवारी (दि.१५) घोषित करण्याची शक्यता असल्याचे बागमार यांनी सांगितले. नाशिक मर्चंट बॅँकेच्या रणांगणात उतरण्यासाठी बहुतांशी माजी संचालक असलेले हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाली काम करणारे माजी आमदार वसंत गिते, विजय साने, सोहनलाल भंडारी आणि हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने त्यामुळे प्रगती पॅनल असे नाव घेतले आहे. या पनलमध्ये बहुतांशी जुनेच संचालक उमेदवार असणार असून, त्यात रजनी जातेगावकर, शोेभा छाजेड, शिवदास डागा, प्रफुल्ल संचेती, भगवान चौधरी यांसह अन्य अनेकांचा समावेश असणार  असल्याचे सूत्रांनी सांगितले. केवळ तीन ते चार नवीन उमेदवार असतील, असे गिते-साने पॅनलच्या सूत्रांनी सांगितले. नाशिक मर्चंट बॅँकेसाठी आता अजित बागमार यांचे नम्रता, गिते-साने-भंडारी यांचे प्रगती तर ललित मोदी-गजानन शेलार यांच्या सहकार पॅनलमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
बागमार कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी
हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या गिते-साने-भंडारी यांच्या पॅनलने बागमार कुटुंबीयांपैकी कोणत्याही एकाला सहभागी करून घेण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. विशेषत: अजित बागमार यांचे सुपुत्र अ‍ॅड. आनंद बागमार यांना पॅनलमध्ये घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही
रिझर्व्ह बॅँकेने पाच वर्षांपूर्वी संचालकांपैकी १२ जणांवर आक्षेप घेतला होता. अशांच्या बरोबर निवडणूक लढविणे हे भविष्यात कायदेशीरदृष्ट्या अडचणीत आणणारे आहे. त्यामुळे हुकूमचंद बागमार यांचे नाव वापरणाºयांना पॅनलसाठी नम्रता हे नाव वापरण्यास मी आक्षेप घेतला आहे. नम्रता पॅनलची लढत सहकार पॅनलशीच होईल.
- अजित बागमार, नेता, नम्रता पॅनल

Web Title:  'Pragati' panel of Baghara supporters in Nomko's election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.