पोलीस पाटील संघटना आंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:50 AM2018-11-27T00:50:51+5:302018-11-27T00:51:13+5:30

राज्यभरातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनदेखील राज्यातील सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातील पोलीस पाटलांचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे यांनी दिली.

 Police Patil Sangh organized the agitation | पोलीस पाटील संघटना आंदोलनाच्या तयारीत

पोलीस पाटील संघटना आंदोलनाच्या तयारीत

googlenewsNext

मातोरी : राज्यभरातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनदेखील राज्यातील सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातील पोलीस पाटलांचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे यांनी दिली.  नाशिक जिल्ह्यातून आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात येत असून, नाशिक जिल्ह्यातून शेकडो पोलीस पाटील सहभागी होणार आहेत. पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ, निवृत्तिवेतन, वारसा हक्क, निवृत्तीचे वय ६५ करावे यांसह अन्य मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिकाजीराव पाटील, राज्याध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून, नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन चिंतामण मोरे, बाजीराव नाना सावंत, अरुण पा. बोडके, संपतराव जाधव, अरुण महाले, बबनराव बेंडकुळे, रवींद्र जाधव, कैलास फोकणे, रमेश पिंगळे, पप्पू मोहिते आदींनी केले आहे.
धरणे धरणार
राज्य शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ तसेच या मागण्यांवर तातडीने योग्य निर्णय घेण्यात यावा, याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

Web Title:  Police Patil Sangh organized the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.