४८ तास उलटूनही पोलिसांना अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:51 AM2019-01-11T01:51:31+5:302019-01-11T01:51:45+5:30

शहरातील कायदासुव्यवस्था धोक्यात आली असून, मंगळवारच्या रात्री इंदिरानगर, कॉलेजरोड या दोन सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात खुनाच्या घटना घडून ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे; मात्र या घटनांमधील एकही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

Police failure fails after 48 hours | ४८ तास उलटूनही पोलिसांना अपयश

४८ तास उलटूनही पोलिसांना अपयश

Next
ठळक मुद्देधागेदोरे हाती : दोन्ही खुनातील संशयित मोकाट; तपासाला गती देण्याची मागणी

नाशिक : शहरातील कायदासुव्यवस्था धोक्यात आली असून, मंगळवारच्या रात्री इंदिरानगर, कॉलेजरोड या दोन सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात खुनाच्या घटना घडून ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे; मात्र या घटनांमधील एकही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
इंदिरानगर परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भरवस्तीत राहत्या इमारतीजवळ जबरी लूट करत संशयितांनी व्यावसायिक अविनाश महादेव शिंदे (३४) यांना धारधार शस्त्राने भोसकून ठार मारल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने इंदिरानगरसह शहर व परिसरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांमध्ये घबराहट पसरली. संशयितांनी शिंदे यांना भोसकल्यानंतरही तेथून पळ काढला नाही, तर त्यांनी घट्ट धरून ठेवलेली सहा लाख रुपयांची बॅग हिसकावूनच पोबारा केला. या जबरी लुटीच्या घटनेत व्यावसायिकाला ठार मारल्यानंतर सहा लाख रुपयांची रोकड लुटून नेण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने ‘खाकी’चा कितपत धाक राहिला? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. एका तरुण व्यावसायिकाची अशाप्रकारे जबरी लूट करून हत्या होत असेल तर ज्येष्ठ नागरिक, महिला सुरक्षित राहणार का? अशी शंकाही परिसरात घेतली जात आहे. इंदिरानगर ज्येष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून ओळखली जाते. या खुनाच्या घटनेने ज्येष्ठ नागरिकांसह संपूर्ण इंदिरानगर परिसर हादरून गेला आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना जरी झाली असली तरी अद्याप त्यांना फारसे यश गुरुवारी (दि.१०) रात्री उशिरापर्यंत आलेले नव्हते.
कॉलेजरोड खुनातील संशयित फरार
पंचवटीमधील तपोवन परिसरातील पायल परदेशीसोबत काही महिन्यांपूर्वी विवाह करून जयेश दामोधर राहत होता. पायलचा त्याच्याकडून छळ सुरू झाल्याने दोघांमध्ये वैमनस्य वाढीस लागले. संशयित जयेश याने तिला सोबत घेऊन जात कॉलेजरोडवरील सत्यमलीला या व्यावसायिक सोसायटीच्या टेरेसवर नेऊन रात्रीच्या सुमारास गळा आवळून ठार मारल्याचे बुधवारी उघडकीस आले. याप्रकरणी पायलची आई सरला परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जयेशविरुद्ध गुन्हा दाखल आहे; मात्र अद्याप त्याचा कुठलाही थांगपत्ता गंगापूर किंवा पंचवटी पोलिसांना लागू शकलेला नाही. पायल ही एका साडीच्या दुकानात नोकरी करत होती, तर जयेश हा एका खासगी कंपनीकडे केबल टाकण्याचे काम करत होता.

Web Title: Police failure fails after 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.