कुळवंडी बीटाने पटकावला पेठ सभापती चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:06 PM2019-01-09T16:06:34+5:302019-01-09T16:06:49+5:30

पेठ : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यातील वांगणी येथे आयोजित जि. प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धेत ९४ गुण मिळवून कुळवंडी बिटाने यंदाचा सभापती चषक पटकावला.

 Peth Chapman Cup | कुळवंडी बीटाने पटकावला पेठ सभापती चषक

कुळवंडी बीटाने पटकावला पेठ सभापती चषक

googlenewsNext
ठळक मुद्दे जि.प. अध्यक्ष चषक : तालुकास्तरीय क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा



पेठ : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यातील वांगणी येथे आयोजित जि. प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धेत ९४ गुण मिळवून कुळवंडी बिटाने यंदाचा सभापती चषक पटकावला.
दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धांचे उद्घाटन जि.प. सदस्य भास्कर गावीत यांच्या हस्ते वांगणी येथील आश्रमशाळेत करण्यात आले. तर दुसरऱ्या दिवशी सभापती पुष्पा गवळी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाºया मुलांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दरवर्षी तालुकास्तरावर सर्वाधिक गुण मिळवणाºया बीटाला जिल्ह्याच्या धर्तीवर पेठ सभापती चषक प्रदान करण्यात येतो. कुळवंडी बीटाने सलग दुसºया वर्षी हा चषक पटकावला आहे. विशेष म्हणजे सभापती चषक देणारा पेठ हा जिल्ह्यात एकमेव तालुका आहे.
सदर विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरमच्या वतीने धावपटूंना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जि. प. सदस्य भास्कर गावित, हेमलता गावित, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशीराम वाघमारे, नगराध्यक्ष मनोज घोंगे, बाजार समिती संचालक शाम गावीत, नंदू गवळी, विलास अलबाड, पुष्पा पवार, गटविकास अधिकारी अनिल नागणे, माजी उपसभापती महेश टोपले, मोहन कामडी, किरण भुसारे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, गटशिक्षणाधिकारी संतोष झोले, शिक्षक संघाचे अध्यक्ष रामदास शिंदे, आदिवासी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोये यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, परिक्षक, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी, बीआरसी विषयतज्ज्ञ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदा जाधव यांनी सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले.

प्रथम विजेते पुढीलप्रमाणे -
लहान गट -
वक्तृत्व स्पर्धा - नयना भोये, इनामबारी
चित्रकला स्पर्धा - जागृती दळवी, शिंदे
वैयक्तकगायन - नंदिनी भोये, विरमाळ
वैयक्तिक नृत्य - वनिता नाठे, खिरकडे
समूह गीत गायन - जि.प. शाळा जळे

समूहनृत्य -जि.प. शाळा म्हसगण
१०० मी. धावणे - वर्षा बोरसे, नाचलोंढी
२०० मी. धावणे -मानस सहारे, कुळवंडी
मोठा गट -
वक्तृत्व स्पर्धा - प्रतिभा बिवसन, इनामबारी
चित्रकला स्पर्धा - योगिता अवतार, दोनवाडे
वैयक्तिक गायन - रत्ना चारोस्कर, दोनवाडे
ैवैयक्तिक नृत्य - भावना इमपाळ, निरगुडे
समुहगीत गायन -जि.प. शाळा,जळे
समूहनृत्य - जि.प. शाळा हातरु ंडी

२०० मी धावणे - रेखा शिंगाडे , घनशेत
४०० मी. धावणे - अनिल चौधरी, नाचलोंढी
खोखो मुली - जि.प. शाळा, कुळवंडी
खोखो मुले - जि.प. शाळा, आंबे
कब्बडी मुली - जि.प. शाळा, राजबारी
कब्बडी मुले - जि.प. शाळा, कळमबारी
 

Web Title:  Peth Chapman Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.