नोकरी महोत्सवात बेरोजगारांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:14 AM2018-04-24T00:14:28+5:302018-04-24T00:14:28+5:30

सिन्नर मतदारसंघातील गरजू बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी डुबेरे येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने येत्या रविवारी (दि. २९) नोकरी महोत्सवाचे सिन्नर महाविद्यालयात आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या नोकरी महोत्सवात तालुक्यातील बेरोजगार युवकांना नोकरीची संधी प्राप्त होणार असल्याचे आमदार वाजे यांनी सांगितले.

 Opportunities for unemployed at the Jobs Festival | नोकरी महोत्सवात बेरोजगारांना संधी

नोकरी महोत्सवात बेरोजगारांना संधी

Next

सिन्नर : सिन्नर मतदारसंघातील गरजू बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी डुबेरे येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने येत्या रविवारी (दि. २९) नोकरी महोत्सवाचे सिन्नर महाविद्यालयात आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या नोकरी महोत्सवात तालुक्यातील बेरोजगार युवकांना नोकरीची संधी प्राप्त होणार असल्याचे आमदार वाजे यांनी सांगितले.  या महोत्सवात सिन्नर मतदारसंघातील पहिली ते सर्व शाखेतील पदवीधर, एमबीए, अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा व डिग्री, आयटीआय उत्तीर्ण तसेच अंतिम पदवी परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. सदर महोत्सवामध्ये बीपीओ, केपीओ, मॅन्युफॅक्चरिंग, अ‍ॅटोमोबाइल, विक्री, फाइनान्स, फॅसिलिटी मॅनेजमेंट, रिटेल, हॉटेल, हॉस्पिटॅलिटी, बॅँकिंग, फार्मसी, ट्रान्सपोर्ट, अकाउंटिंग, टेलिकॉम, एनजीओ, व्यवस्थापन, टेक्निकल सपोर्ट, रियल इस्टेट, मीडिया आणि मनोरंजन, फूड आणि बावर्ची, हार्डवेअर, केमिकल, शेतीतज्ज्ञ, वापर आणि ऊर्जा, हेल्थ व मेडिकल, पॅकिंग आणि पेपर, बांधकाम, ब्रोकिंग, पर्यटन इत्यादी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमोर समक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना याच ठिकाणी नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारांसाठी दोन कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहून निवड करणार आहेत.  या भव्य रोजगार महोत्सवाला मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, सिन्नर तालुका जनसेवा मंडळ, सह्याद्री युवा मंच, सिन्नर तालुका शिवसेना यांचे सहकार्य लाभले आहे.
या नोकरी महोत्सवात उपलब्ध होणाºया संधीचा सर्व गरजू बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक आमदार राजाभाऊ वाजे, त्र्यंबक वाजे, राजहंस माळी व सर्व संचालक मंडळाच्या वतीने यावेळी करण्यात आले.
महोत्सवात सहभाग घेण्यासाठी अर्ज आमदार राजाभाऊ वाजे संपर्क कार्यालय, सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मुसळगाव, लोकनेते पतसंस्था कार्यालय, टाकेद येथील आमदार वाजे यांचे संपर्क कार्यालय येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर अर्ज भरून दि. २९ एप्रिल रोजी महोत्सवास उमेदवारांनी येताना बायोडाटा कमीत कमी पाच प्रतीत, पासपोर्ट साइज फोटो व मूळ कागदपत्रे आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title:  Opportunities for unemployed at the Jobs Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.