मालेगावी अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:09 AM2017-08-22T01:09:19+5:302017-08-22T01:09:35+5:30

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील व मुख्य रस्त्यालगतचे सुमारे दीडशे अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविली. या अतिक्रमण हटाव मोहिमेला कॅम्परोडवर साई एकता युनियनच्या पदाधिकाºयांनी तीव्र विरोध केला. हॉकर्स झोनच्या निश्चितीनंतरच अतिक्रमण काढावे या मागणीवर युनियनचे पदाधिकारी ठाम होते. अतिक्रमण विभागाचे वाहन अडवून काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 Opponents to Malegaavi encroachment removal campaign | मालेगावी अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध

मालेगावी अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध

Next

मालेगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील व मुख्य रस्त्यालगतचे सुमारे दीडशे अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविली. या अतिक्रमण हटाव मोहिमेला कॅम्परोडवर साई एकता युनियनच्या पदाधिकाºयांनी तीव्र विरोध केला. हॉकर्स झोनच्या निश्चितीनंतरच अतिक्रमण काढावे या मागणीवर युनियनचे पदाधिकारी ठाम होते. अतिक्रमण विभागाचे वाहन अडवून काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. साई हॉकर्स एकता युनियनच्या पदाधिकाºयांनी या मोहिमेला तीव्र विरोध करीत नो हॉकर्स झोन निश्चितीनंतर अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी देवा पाटील, दिनेश ठाकरे, आसिफ तांबोळी, सुधाकर जोशी, राजेंद्र पाटील, रामा देवरे आदिंसह पदाधिकाºयांनी कॅम्परोडवर अतिक्रमण विभागाच्या गाड्या अडवून ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, छावणीचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत विश्वकर्मा, सहाय्यक आयुक्त खैरनार, प्रभाग अधिकारी सोनवणे आदिंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. मंगळवारी (दि. २२) कुसुंबारोडलगतचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.



 

Web Title:  Opponents to Malegaavi encroachment removal campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.