केटीएचएम महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 05:51 PM2019-01-25T17:51:16+5:302019-01-25T17:52:02+5:30

नाशिक : कोट्यवधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मूठभर लोकांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, ...

nsk,national,seminar,organized,department,sociology,college | केटीएचएम महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

केटीएचएम महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

googlenewsNext
ठळक मुद्देचर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० जणांची नोंदणी

नाशिक : कोट्यवधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मूठभर लोकांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, आयुष्याची गुणवत्ता, लिंगभेद, विकास निर्देशांक, यांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली असून, सामाजिक सौररचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रुती तांबे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व केटीएचएम महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आयोजित दोन दिवसीय ‘रिथनिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड डिस्प्लेसमेंट आॅफ इंडिया’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. व्यासपीठावर माजी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. बी. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय सावळे उपस्थित होते.
डॉ. तांबे म्हणाल्या की, समाजशास्त्र विकासाचा अभ्यास पुरेशा गांभीर्याने केला का? असे विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. आर. बी. पाटील म्हणाले, भारतामध्ये प्रामुख्याने खाणी, खासगी उद्योग, अभयारण्ये, धरणे यामुळे विस्थापितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याचा परिणाम आदिवासींवर याचा परिणाम आदिवासींवर होतो. पुनर्वसनासंदर्भात कायदे असून, त्याचा योग्य तो वापर होत नाही त्यामुळे पुनर्वसित नागरिकांना सुविधा मिळत नाही वारणा व कोयना धरण हे याबाबतचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
दिल्ली विद्यापीठ समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. नंदिनी सुंदर यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये विस्थापित होणाऱ्यांमध्ये गरीब मोठ्या प्रमाणावर असतात. विस्थापित झाल्यावर सामाजिक संरचना बदलते त्यामुळे असमानता निर्माण होते. नाते-संबंधामध्ये दरी निर्माण होत. लोकांमध्ये एकतेची भावना राहत नाही; याचा परिणाम समाज संरचनेवर होतो, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समृद्धी महामार्ग या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित होणार आहेत. याला तुम्ही विकास म्हणू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून लोकांनी संघटित होऊन याला विरोध करणे अपेक्षित आहे, असे मत त्यांनी मांडले. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला.
प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. संजय सावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.तुषार पाटील यांनी, तर आभार प्रा. डी. एच. शिंदे यांनी मानले. यावेळी प्रा. उमेश शिंदे, प्रा.शशिकांत माळोदे यांनी परिश्रम घेतले. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० जणांनी नोंदणी केली आहे.

 

Web Title: nsk,national,seminar,organized,department,sociology,college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.