स्वत:च्या मिळकतींनाही नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:47 AM2018-04-17T01:47:44+5:302018-04-17T01:47:44+5:30

महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी मोठ्या उत्साहाने काम करणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाने आता एकही मिळकत करवसुलीशिवाय ठेवायची नाही? असा निर्धार केला असून, त्या अंतर्गत शहरातील खासगी मिळकती, देवस्थान इतकेच नव्हे पालिकेच्याच समाजमंदिरे आणि अंगणवाड्यांनादेखील नोटिसा बजावण्याचा सपाटा लावला आहे. स्वमालकीच्या इमारतींनाच नोटिसा देण्याच्या पालिकेच्या प्रामाणिकपणाची नगरसेवकांच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

 Notice of own property | स्वत:च्या मिळकतींनाही नोटिसा

स्वत:च्या मिळकतींनाही नोटिसा

googlenewsNext

नाशिक : महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी मोठ्या उत्साहाने काम करणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाने आता एकही मिळकत करवसुलीशिवाय ठेवायची नाही? असा निर्धार केला असून, त्या अंतर्गत शहरातील खासगी मिळकती, देवस्थान इतकेच नव्हे पालिकेच्याच समाजमंदिरे आणि अंगणवाड्यांनादेखील नोटिसा बजावण्याचा सपाटा लावला आहे. स्वमालकीच्या इमारतींनाच नोटिसा देण्याच्या पालिकेच्या प्रामाणिकपणाची नगरसेवकांच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. घरपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले आणि यंत्रणेला कामाला लावले आहे. यंदा कधी नव्हे ते मार्च एन्डिंगनंतरदेखील पालिकेच्या वतीने थकीत करवसुलीसाठी कारवाई कायम ठेवली असून, टॉप फिफ्टी मिळकतींचा लिलाव येत्या २५ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
याशिवाय यंदा प्रथमच ९० कोटी रुपयांची घरपट्टी वसूल झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कारभारी उत्साहात असून, याच उत्साहाच्या भरात एकही मिळकत न वगळता नोटिसा बजावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरातील अनेक देवस्थाने, महपाालिकेच्या मालकीची समाजमंदिरे आणि इतकेच नव्हे तर अंगणवाड्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. महापालिकेने बांधलेली समाजमंदिरे ही विविध सेवाभावी संस्थांना देखभाल दुरुस्ती तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी देण्यात आली आहेत. अशा संस्थांना त्याच समाजमंदिराच्या घरपट्टी भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही मंदिरे आणि धर्मस्थळांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांनी परिसरातील नगरसेवक तसेच आमदारांकडे धाव घेतली आहे. अनेक समाजमंदिरे हे संबंधित मंडळांकडून व्यावसायिक कारणासाठी वापरली जातात, असा प्रशासनातील अधिकाºयांचा दावा आहे. मात्र, महापालिकेने स्वत:तच बांधलेल्या आणि महापालिकाच संचलित करीत असलेल्या अंगणवाड्यांनादेखील नोटिसा बजावल्या असून, संबंधित अंगणवाडी सेविका बुचकळ्यात पडल्यात आहेत.

Web Title:  Notice of own property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.