कंत्राटी कर्मचाºयांसाठी उभारणार लढा नम्बुदरी : दोनदिवसीय परिषद; कर्मचाºयांच्या मागण्यांवर विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:34 AM2017-12-04T00:34:40+5:302017-12-04T00:37:08+5:30

नाशिक : एकेकाळी देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अशी बिरुदावली मिरविणाºया भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कायमस्वरूपी एक लाख तर कंत्राटी कर्मचाºयांची एक लाख ३० हजार संख्या आहे़ कंत्राटी कर्मचाºयांना कायमस्वरूपी करून किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता यांसह विविध सुविधा मिळाव्यात, या मागण्यांसाठी आगामी काळात युनियन तीव्र लढा देणार असल्याचे प्रतिपादन आॅल इंडिया बीएसएनएल कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष व्ही. ए. एन. नम्बुदरी यांनी रविवारी (दि़३) केले़

Nimbudri: The two-day conference will be organized for contract workers; Discussions on the demands of employees | कंत्राटी कर्मचाºयांसाठी उभारणार लढा नम्बुदरी : दोनदिवसीय परिषद; कर्मचाºयांच्या मागण्यांवर विचारमंथन

कंत्राटी कर्मचाºयांसाठी उभारणार लढा नम्बुदरी : दोनदिवसीय परिषद; कर्मचाºयांच्या मागण्यांवर विचारमंथन

googlenewsNext
ठळक मुद्देकंत्राटी कर्मचाºयांसाठी उभारणार लढा नम्बुदरी : दोनदिवसीय परिषद; कर्मचाºयांच्या मागण्यांवर विचारमंथन


बीएसएनएलच्या दोनदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आॅल इंडिया कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे सचिव अनिमेश मित्रा़ समवेत राजेंद्र लहाने, नागेश नलावडे, आप्पासाहेब गाजरे, सलीम शेख, सीताराम ठोंबरे, व्ही. ए. एन. नम्बुदरी, डॉ़ डी़ एल़ कराड, जॉन वर्गिस़.
नाशिक : एकेकाळी देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अशी बिरुदावली मिरविणाºया भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कायमस्वरूपी एक लाख तर कंत्राटी कर्मचाºयांची एक लाख ३० हजार संख्या आहे़ कंत्राटी कर्मचाºयांना कायमस्वरूपी करून किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता यांसह विविध सुविधा मिळाव्यात, या मागण्यांसाठी आगामी काळात युनियन तीव्र लढा देणार असल्याचे प्रतिपादन आॅल इंडिया बीएसएनएल कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष व्ही. ए. एन. नम्बुदरी यांनी रविवारी (दि़३) केले़
कॅनडा कॉर्नरवरील दूरसंचार कार्यालयात बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन व बीएसएनएल कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियनच्या दोनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, या युनियनच्या उद्घाटनप्रसंगी नम्बुदरी बोलत होते़ पुढे बोलताना नम्बुदरी म्हणाले की, कामगार चळवळीला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले असून, शासन मूठभर लोकांसाठी कामगारांची पिळवणूक करीत आहे़
बीएसएनएल कंपनीचे खासगीकरण होऊ नये, कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी, कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी कंत्राटी कामगारांनी संघटना स्थापन करावी,
बीएसएनएल युनियन या संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असे आश्वासन नम्बुदरी यांनी यावेळी दिले़
आॅल इंडिया कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे सचिव अनिमेश मित्रा यांनी शासन कामगारांवर कसा अन्याय करते याबाबत माहिती दिली़ किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता या सुविधा कंत्राटी कर्मचाºयांनाही मिळाव्यात यासाठी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला़ यावेळी व्यासपीठावर बीएसएनएलचे आॅल इंडिया असिस्टंट जनरल सेक्रेटरी जॉन वर्गिस, सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ़ डी़ एल़ कराड, महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष आप्पासाहेब गाजरे, सीताराम ठोंबरे उपस्थित होते़ महाराष्ट्र सर्कलचे सचिव नागेश नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले़ राजेंद्र लहाने यांनी प्रास्ताविक केले़
या परिषदेला आॅल इंडिया कॉन्ट्रॅक वर्कर्स युनियनचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्यासह युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ दरम्यान, परिषदेत सोमवारी (दि़४) होणाºया बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनमध्ये सातव्या वेतन आयोगाची मागणी केली जाणार असून, यासाठी महाराष्ट्रातील युनियनचे जिल्हा सचिव उपस्थित राहणार आहेतक़ामगारांनी केवळ आंदोलने न करता राजकारणातून सत्तेत येण्याचा प्रयत्न करायला हवा तेव्हाच त्यांचे प्रश्न सुटू शकतात़ आतापर्यंत न्यायासाठी कामगारांना रस्त्यावर उतरावे लागते, मात्र कालांतराने पुन्हा आंदोलन करावे लागते़ त्यामुळे कामगारांनी सत्ताधारी कसे होता येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे़
- डॉ. डी. एल. कराड,
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, सीटू

Web Title: Nimbudri: The two-day conference will be organized for contract workers; Discussions on the demands of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.