निकवेलला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:26 AM2018-02-25T00:26:23+5:302018-02-25T00:26:23+5:30

बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात गुरुवारी (दि. २२) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यता बांधलेले वासरू फक्त केल्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Niklail killed a calf in a leopard attack | निकवेलला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

निकवेलला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

Next

निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात गुरुवारी (दि. २२) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यता बांधलेले वासरू फक्त केल्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहश-तीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील शेतकºयांनी वन विभागाने त्वरित पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.  येथील शेतकरी पंढरीनाथ महाजन सकाळी शेतात गेले असता गोठ्यात वासरू मरण पावलेले दिसले. तसेच त्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले. त्यांनी त्वरित वनकमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. वन कर्मचारी मोरे यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन अधिकाºयांकडे केली. निकवेल वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे, नीलेश वाघ, उपसंरपच मुरलीधर वाघ, विजय वाघ, पंढरीनाथ महाजन, राजेंद्र महाजन, संजय सोनवणे, कडू वाघ यांच्यासह ग्रामस्थ व शेतकºयांनी केली आहे.
दहिंदुले, जोरण, कंधाणे शिवारात नेहमी आढळणारा बिबट्या गेल्या काही दिवसांपासून निकवेल गावात मुक्त संचार करताना दिसत आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याने शेतकरी, मजूर व पशुपालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री निकवेल येथील रस्त्यावरील शेतीतील गट नं. १६/१/१मधील पंढरीनाथ वामन महाजन यांच्या बांधलेल्या गायीच्या दावणीवर बिबट्याने रात्री सुमारास हल्ला केला.

Web Title: Niklail killed a calf in a leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.