नरहरी झिरवाळ यांना न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 10:21 PM2021-08-28T22:21:03+5:302021-08-28T22:21:29+5:30

दिंडोरी । राजभवन येथे नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना राज्यपालांच्या हस्ते न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार देण्यात आला. याच श्रेणीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Newsmakers Achievers Award to Narhari Jirwal | नरहरी झिरवाळ यांना न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार

नरहरी झिरवाळ यांना न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना देखील हा पुरस्कार

दिंडोरी । राजभवन येथे नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना राज्यपालांच्या हस्ते न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार देण्यात आला. याच श्रेणीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे.
राज्यपालांच्या हस्ते समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 24 व्यक्तींना 13 वे न्यूजमेकर्स अचिव्हर्स राजभवन पुरस्कार येथे गुरुवारी प्रदान करण्यात आले. सोबतच प्रशासन, उद्यमशीलता, पत्रकारिता, विधी व न्याय, अभिनय आणि इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. यात मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, एमपीएससीचे सदस्य डॉ प्रताप दिघावकर,प्रताप व्यावसायिक,हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत,अभिनेते मनोज वाजपेयी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, वकील मृणालिनी देशमुख, वसंत शिंदे, डॉ. प तेलंग, रोहण दुआ, पत्रकार खलील गिरकर, पत्रकार संजय जोग, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सुशांत सिन्हा, चेतन शशीतल, पोलीस अधिकारी सुनील कडासने व उषा पटेल यांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आफ्टरनून व्हॉइस वृत्तपत्रातर्फे करण्यात आले होते. वर्तमान पत्राच्या मुख्य संपादिका वैदेही तमन यांनी सूत्रसंचलन व पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला.

Web Title: Newsmakers Achievers Award to Narhari Jirwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.