अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:36 AM2018-10-23T00:36:49+5:302018-10-23T00:37:22+5:30

कोणतीही भाषा वाईट नसून राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करा. मुलांमध्ये बालवयातच हिंदीचे संस्कार करण्याबरोबर प्रत्येक भाषेचे व्याकरण जतन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कपिलदेव प्रसाद मिश्र यांनी केले.

National Hindi Sahitya Sammelan by All India Literary Meet | अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन

अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन

googlenewsNext

नाशिकरोड : कोणतीही भाषा वाईट नसून राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करा. मुलांमध्ये बालवयातच हिंदीचे संस्कार करण्याबरोबर प्रत्येक भाषेचे व्याकरण जतन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कपिलदेव प्रसाद मिश्र यांनी केले. अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे जेलरोड येथे रविवारी राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी कपिलदेव मिश्र बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुबोध मिश्र, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, भरत सिंह, रमेश शर्मा, शिला डोंगरे, स्वप्नील कुलकर्णी, रामकृष्ण सहस्त्रबुध्दे, भरत शहा, भरत सिंग, श्रद्धा शिंदे, सुनीता माहेश्वरी, राजेश झनकर, दीपा कुचेकर, अतुल देशपांडे, प्रदीप दुबे, अनिता दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सुशील पांडे, अशोक तिवारी, भाग्यम शर्मा, मंजरी बेलापूरकर, कृपाशंकर शर्मा, नीलम देवी, ब्रजबिहारी शुक्ल, ब्रजेन्द्र द्विवेदी, शांती तिवारी, सादिका नवाब, अल्का पांडे, उमाकांत वाजेयी, विजय मिश्र, सतीश शर्मा, जयप्रकाश सूर्यवंशी, विद्या सागर, वीरेंद्र गुप्त, सुरेश मिश्र, पूनम बंसल आदींसह राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड आदी राज्यातील कवींना यांना साहित्य श्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सी. पी. मिश्रा आणि नेहा अवस्थी यांनी केले.  दुपारच्या सत्रात काव्यसंमेलनामध्ये जयप्रकाश सूर्यवंशी, लक्ष्मीकांत कोतकर, प्रतिभा माही, विद्यासागर मिश्र, सुनीता माहेश्वरी, दौलत राय, नीलिमा मिश्रा, रागिनी बाजपेयी, सुनील वाघ, शैलेश, ब्रजबिहारी शुक्ल, रामस्वरूप शाहूजी, इर्शाद आदींनी विविध विषयांवर हिंदी कविता सादर केल्या.

Web Title: National Hindi Sahitya Sammelan by All India Literary Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.