त्र्यंबकेश्वर जमीन घोटाळ्यातील आरोपींची अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:55 PM2018-02-27T23:55:24+5:302018-02-27T23:55:24+5:30

नाशिक : देवस्थान जमिनीवर कुळ लावण्याची तरतूद नसतानाही कुळाची नोंद करून त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानाची सुमारे दोनशे कोटी रुपयांची जमीन परस्पर बांधकाम व्यावसायिकास विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले़ या प्रकरणी तत्कालीन तहसीलदार, प्रांत अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी या महसूल खात्याच्या अधिका-यांसह बांधकाम व्यावसायिक सचिन दप्तरे व अन्य अशा २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घोटाळ्यातील संशयितांपैकी त्र्यंबकेश्वरचे तत्कालीन प्रांत रामसिंग हिरालाल सुलाने, मंडळ अधिकारी नंदकुमार मुकुंदराव बिरारी व तलाठी भास्कर मुरलीधर हांडोरे या तिघांनी मंगळवारी (दि़२७) जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली़

nashik,Trimbakeshwar,land,scam,accused,court,anticipatory,bail | त्र्यंबकेश्वर जमीन घोटाळ्यातील आरोपींची अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव

त्र्यंबकेश्वर जमीन घोटाळ्यातील आरोपींची अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव

Next
ठळक मुद्देत्र्यंबक देवस्थान : दोनशे कोटींची जमीनतिघांच्या अटकपूर्ववर ३ मार्चला सुनावणी

नाशिक : देवस्थान जमिनीवर कुळ लावण्याची तरतूद नसतानाही कुळाची नोंद करून त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानाची सुमारे दोनशे कोटी रुपयांची जमीन परस्पर बांधकाम व्यावसायिकास विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले़ या प्रकरणी तत्कालीन तहसीलदार, प्रांत अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी या महसूल खात्याच्या अधिका-यांसह बांधकाम व्यावसायिक सचिन दप्तरे व अन्य अशा २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घोटाळ्यातील संशयितांपैकी त्र्यंबकेश्वरचे तत्कालीन प्रांत रामसिंग हिरालाल सुलाने, मंडळ अधिकारी नंदकुमार मुकुंदराव बिरारी व तलाठी भास्कर मुरलीधर हांडोरे या तिघांनी मंगळवारी (दि़२७) जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली़

जिल्हा व सत्र न्यायाधीश वैष्णव यांच्या न्यायालयात सुलाने, बिरारी व हांडोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले़ या अर्जावर सरकार वकिलांचे म्हणणे मागविण्यात आले असून, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर हे शनिवारी (दि़३ मार्च) आपले म्हणणे मांडणार आहेत़ त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थान व गंगाद्वार ट्रस्टच्या मालकीच्या सुमारे १८५ एकर इनामी जमिनीवरील कुळ हे शासन व धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता बदलले गेले व महसूल अधिका-यांनी बांधकाम व्यावसायिक सचिन दिनकर दप्तरी यांचे नाव सातबारा उताºयावर कुळ म्हणून लावले. यासंदर्भात शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यावर त्याचे उत्तर देताना कागदपत्र तपासणीतून विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास ही बाब आली.

देवस्थानची जमीन धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विक्री करता येत नाही तसेच शासनाने संबंधित देवस्थानाला सदरची जमीन इनाम म्हणून दिलेली असताना त्यावर कुळाचे नाव लावता येत नसतानाही देवस्थानने जमिनीची परस्पर बेकायदेशीर विक्री केल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश झगडे यांनी जिल्हाधिकाºयांना दिले होते. त्यावर जिल्हा प्रशासनाने टाळाटाळ चालविली होती. परंतु अधिवेशनाच्या तोंडावर हा मुद्दा उपस्थित झाल्याने अखेर शनिवारी रात्री उशिरा त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार एस. एम. निरगुडे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये त्र्यंबकेश्वरचे तत्कालीन प्रांत रामसिंग सुलाने, तहसीलदार रवींद्र भारदे, मंडळ अधिकारी नंदकिशोर बिरारी व तलाठी बी. एम. हांडोरे यांचा समावेश असून देवस्थानचे मूळ वहिवाटदार प्रभाकर शंकर महाजन यांनाही आरोपी करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांची देवस्थान जमिनीच्या या घोटाळ्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे शनिवारी गुन्हा दाखल होताच काही संशयित फरार तर काहींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे़

Web Title: nashik,Trimbakeshwar,land,scam,accused,court,anticipatory,bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.