‘दर्पण’ सुविधेमुळ े ग्रामीण टपाल यंत्रणेला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:02 PM2019-07-01T17:02:22+5:302019-07-01T17:03:20+5:30

नाशिक : खेड्यापाड्यापर्यंत पोहचलेल्या टपाल विभागाने आपली यंत्रणा आॅनलाइन करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सेवाही डिजिटल केली आहे. त्यानुसार वर्षभरापूर्वी ‘आरआईसीटी’ ...

nashik,speed,up,the,rural,mail,system | ‘दर्पण’ सुविधेमुळ े ग्रामीण टपाल यंत्रणेला गती

‘दर्पण’ सुविधेमुळ े ग्रामीण टपाल यंत्रणेला गती

googlenewsNext
ठळक मुद्देयोजनेची वर्षपूर्ती: आॅनलाइनमुळे ग्राहकांचा वाढला सहभाग

नाशिक : खेड्यापाड्यापर्यंत पोहचलेल्या टपाल विभागाने आपली यंत्रणा आॅनलाइन करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सेवाही डिजिटल केली आहे. त्यानुसार वर्षभरापूर्वी ‘आरआईसीटी’ उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या ‘दर्पण’ योजनेमुळे ग्रामीण भागातील टपाल सुविधेला गती मिळाली असून, खातेदारांची संख्या दुपटीने देवाण-घेवाणीच्या व्यवहाराला चालना मिळाली, अशी माहिती प्रवर डाकपाल एम. एस. अहिरराव यांनी दिली.
‘द रुरल इन्फॉरमेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ अंतर्गत ‘डिजिटल अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ रुरल पोस्ट आॅफिस फॉर न्यू इंडिया’ अर्थात दर्पण उपक्रमांर्गत ग्रामीण भागातील टपाल सुविधेला गती देण्याचा कार्यक्रम वर्षभरापूर्वी हाती घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २६७ ग्रामीण टपाल कार्यालयांमध्ये शाखा डाकपाल यांच्या माध्यमातून डिजिटल टपाल सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांचे परालंबित्व कमी होऊन नवीन खाते उघड्यापासूत ते आर्थिक देवाण-घेवणाची कामे लागलीच होऊ लागल्याने ग्राहकांचा या यंत्रणेवरील विश्वास वाढल्याचे ग्राहकांच्या संख्येवरून दिसून आले आहे.
आर्थिक देवाणघेवाणीच्या कामाला यापूर्वी विलंब लागत होता. शाखा कार्यालय ते तालुका टपाल कार्यालयापर्यंतचा प्रवास, मंजुरी आणि पुन्हा त्याच मार्गाने ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा कालावधी मोठा होता. परंतु आता एका दिवसात आर्थिक व्यवहार होऊ लागले आहेत तर काही मिनिटांमध्ये खाते सुरू करता येत असल्यामुळे या व्यवस्थेमुळे ग्राहकही टपाल विभागाकडे आकर्षित झाले आहेत, अशी माहिती सहायक अधीक्षक पंकज कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: nashik,speed,up,the,rural,mail,system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.