महावितरणने महिनाभरात बदलले ४१ हजार मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:32 PM2018-02-21T22:32:04+5:302018-02-21T22:38:11+5:30

चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांची नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आहे. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी सक्षम वीजमीटर बसविण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.

nashik,msdcl,changed,month,thousand,meters | महावितरणने महिनाभरात बदलले ४१ हजार मीटर

महावितरणने महिनाभरात बदलले ४१ हजार मीटर

googlenewsNext
ठळक मुद्देसक्षम वीजमीटर बसविण्याची मोहीम सुरू मीटरची मागणी व गरज लक्षात घेऊन नवीन मीटरचे वितरण

नाशिक : चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांची नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आहे. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी सक्षम वीजमीटर बसविण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.
नादुरु स्त मीटरमुळे ग्राहकांना मनस्ताप, तर महावितरणला नुकसान सहन करावे लागते. मीटर बंद असणे, तुटलेला डिस्प्ले, नादुरु स्त मीटर या कारणांमुळे ग्राहकांचा अचूक वीज वापर नोंदविला जात नाही. परिणामी बिलासंदर्भात वाद निर्माण होऊन महावितरणला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच महावितरणने नियमित आणि अचूक बिलिंगला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर दिला आहे. नवीन वीजजोडणी तसेच नादुरु स्त मीटर बदलण्यासाठी महावितरणने पुरेशा प्रमाणात वीजमीटरचा साठा उपलब्ध करून दिला आहे. मीटरची मागणी व गरज लक्षात घेऊन नवीन मीटरचे वितरण होत आहे.
नाशिक परिमंडळात गेल्या महिनाभरात ८० हजार सिंगल फेजच्या नवीन मीटरमधून ४१ हजार २५६ जुने मीटर बदलण्यात आले. नाशिक शहर मंडळात २२ हजार ७७५, मालेगाव मंडळात ८५९७, तर अहमदनगर मंडळात ९७८४ मीटर बदलण्यात आले आहेत. बदलेल्या मीटरची विभागनिहाय आकडेवारी - नाशिक शहर मंडळ : नाशिक शहर विभाग १- ९४३९, नाशिक शहर विभाग २- ७१२१, नाशिक ग्रामीण- ३८९३, चांदवड- २४२२, मालेगाव मंडळ : मालेगाव- ३२२६, मनमाड- २३०८, सटाणा- १७२८, कळवण- १३३५, अहमदनगर मंडळ : अहमदनगर शहर- २०२५, अहमदनगर ग्रामीण- ५८२, कर्जत- ५८२, श्रीरामपूर- १७६५, संगमनेर- ५१५६ याप्रमाणे वीजमीटर बदलण्यात आले आहेत.

Web Title: nashik,msdcl,changed,month,thousand,meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.