विकलांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:46 PM2018-07-07T22:46:04+5:302018-07-07T22:47:12+5:30

नाशिक : अवघ्या साडेआठ वर्षांच्या मानसिकदृष्ट्या विकलांग अल्पवयीन मुलीस घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करणारा शिवनाथ मोतीराम बोरसे (रा़ यशवंतनगर ता. जि. नाशिक) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी शनिवारी (दि़७) जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

nashik,minor,girl,accused,Life,imprisonment,conviction | विकलांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

विकलांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

Next
ठळक मुद्देजिल्हा जिल्हा व सत्र न्यायालय : २०१५ची घटना

नाशिक : अवघ्या साडेआठ वर्षांच्या मानसिकदृष्ट्या विकलांग अल्पवयीन मुलीस घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करणारा शिवनाथ मोतीराम बोरसे (रा़ यशवंतनगर ता. जि. नाशिक) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी शनिवारी (दि़७) जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ २३ आॅक्टोबर २०१५ रोजी ऐन दस-याच्या दिवशी ही घटना घडली होती़ या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत राहणा-या अवघ्या साडेआठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस आरोपी शिवनाथ बोरसे हा यशवंतनगरमधील स्वत:च्या घरात घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला़ ऐन दस-याच्या दिवशी ही घटना घडली होती़ न्यायाधीश घोडके यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील विनयराज तळेकर व सुप्रिया गोरे यांनी दहा साक्षीदार तपासले़ त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी व पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली़ न्यायालयासमोर आलेले साक्षीदार व पुराव्यानुसार आरोपी बोरसे यास दोषी ठरविण्यात आले़

न्यायाधीशांनी आरोपी शिवनाथ बोरसे यास जन्मठेप तसेच २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ तसेच दंडाची ही रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले़

Web Title: nashik,minor,girl,accused,Life,imprisonment,conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.