शासकीय आरोग्यसेवेसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 04:55 PM2019-07-18T16:55:42+5:302019-07-18T16:56:29+5:30

नाशिक : होमिओपॅथिक चिकित्सकांना शाासकीय आरोग्य सेवेत सामावून घेण्याबरोबरच त्यांना राष्टÑीय आरोग्य मिशन योजनेतही नियुक्ती देण्याच्या मागणीबरोबरच अन्य मागण्यांसाठीचा ...

nashik,homeopathy,doctors,encouragement,for,government,health | शासकीय आरोग्यसेवेसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स आग्रही

शासकीय आरोग्यसेवेसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स आग्रही

Next

नाशिक : होमिओपॅथिक चिकित्सकांना शाासकीय आरोग्य सेवेत सामावून घेण्याबरोबरच त्यांना राष्टÑीय आरोग्य मिशन योजनेतही नियुक्ती देण्याच्या मागणीबरोबरच अन्य मागण्यांसाठीचा लढा अद्यापही सुरूच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून होमिओपॅथिक चिकित्सकांची संघटना यासाठी प्रयत्न करीत आहेत. या संघटनेने नुकतीच आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली.
गेल्या सोमवार (दि.१५) मंत्रालयात होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संघटनेने आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली होमिओपॅथी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्र्यांसमवेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. होमिओपॅथिक चिकित्सकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, केंद्रीय होमिओपॅथिक परिषद कायदा १९७३ मधील तरतुदीनुसार होमिओपॅथिक डॉक्टर्स यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे अधिकार प्रदान करण्यात यावेत, वेलनेस सेंटर, १०८ रु ग्णवाहिका तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशन या योजनेत होमिओपॅथिक डॉक्टर्स यांची नियुक्ती करण्यात यावी व डॉ. सावरीकर समितीचा अहवाल मंजूर करावा आदी मागण्यांवर यावेळी चर्चा झाली.
यावेळी केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे यांनी सर्व कागदपत्रांचा संदर्भ देऊन हायकोर्टात दाखल केलेल्या केसेसचा आधार घेऊन आपल्या प्रलंबित मागण्यांचे महत्त्व पटवून दिले मागण्या मंजूर झाल्या नाही तर प्रसंगी आंदोलनाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
यावेळी डॉ. श्रीराम सावरीकर (सल्लागार, वैद्यकीय शिक्षण विभाग) डॉ. राजकुमार पाटील (अध्यक्ष, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषद), डॉ. अजित फुंदे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषद), डॉ. गोविंद तित्तर (उपसंचालक, होमिओपॅथी) डॉ. अमित भस्मे (सिनेट सदस्य, आरोग्य विद्यापीठ,) डॉ. स्वानंद सोनार (वैद्यकीय अधिकारी, शासकीय होमिओपॅथिक रुग्णालय), डॉ. सोमनाथ गोसावी (सदस्य, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषद), डॉ. बाळकृष्ण गायकवाड (सदस्य, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषद), डॉ. सौ. सुडे (प्र. प्रबंधक, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषद), डॉ प्रतीक तांबे, राम सांगले, डॉ. राहुल पवार, डॉ. अनिल हरदासमलानी आदी उपस्थित होते.

Web Title: nashik,homeopathy,doctors,encouragement,for,government,health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.