वाहतूक कोंडीमुळे पुणे मार्गावरील बसेस विलंबाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 05:39 PM2019-11-24T17:39:52+5:302019-11-24T17:42:00+5:30

नाशिक : रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे ...

nashik,due,to,delay,in,traffic,buses,on,pune,route,are,delayed | वाहतूक कोंडीमुळे पुणे मार्गावरील बसेस विलंबाने

वाहतूक कोंडीमुळे पुणे मार्गावरील बसेस विलंबाने

googlenewsNext
ठळक मुद्देघाटात ट्रक अडकला : सात तास वाहतूक विस्कळीत

नाशिक : रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे नियोजन कोलमडले आहे. स्थानकातून बसेस नियोजित वेळेत सोडण्यात आल्या असल्या तरी नारायणगाव ते खेड दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडीत बसेस अडकून पडल्या होत्या. एका बाजूने अत्यंत संथ वाहने सोडण्यात येत असल्याने दुपारी १ वाजता वाहतूक काही प्रमाणात सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
नाशिकहून दररोज पुणे येथे शिवशाही, एशियाड आणि साध्या बसेस गाड्या धावतात. सुमारे दर अर्ध्या तासाने नाशिकहून पुण्याकडे आणि पुण्याहून नाशिकला बसेसची वाहतूक सुरू असते. त्याचप्रमाणे अन्य डेपोंच्या दोन्ही शहरांमध्ये येणाºया बसेसदेखील आहेत. रविवारी या सर्व गाड्यांना पुण्याला पोहोचण्याला आणि नाशिकला येणाºया गाड्यांनाही विलंब झाला. खेड घाटात रविवारी पहाटे बंद पडलेला ट्रक सोडून ड्रायव्हर निघून गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
रस्त्याच्या मध्येच ट्रक बंद पडल्याने येणाºया-जाणाºया वाहनांच्या चालकांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याने समोरासमोर आलेल्या वाहनांमुळे कोंडीत अधिकच भर पडली. एका बाजूला बंद पडलेला ट्रक, दुसºया बाजूला घाट आणि समोर तसेच मागेही वाहनांची रांग लागल्याने जागेवरून गाडी काढणेही कठीण झाले होते. त्यामुळे अधिकच गोंधळ उडून वाहतूक कोंडी वाढतच गेली. पहाटेची वेळ असल्यामुळे आणि चालक जागेवर नसल्याची बाब बराच वेळानंतर लक्षात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ट्रक जागेवरून काढण्याचा मोठा प्रश्न होता.

Web Title: nashik,due,to,delay,in,traffic,buses,on,pune,route,are,delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.