नाशिकच्या महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला घातला खोडा, स्वच्छ सर्वेक्षणात टॉपटेनमध्ये येण्याबाबत व्यक्त केली साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 08:07 PM2018-01-08T20:07:03+5:302018-01-08T20:08:35+5:30

स्वच्छ सर्वेक्षणाचे आव्हान : शिवसेनेकडून मात्र चमकोगिरीबद्दल टीकास्त्र

 Nashik Mayor dares the CM's dream, expresses concern about coming in top of clean survey | नाशिकच्या महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला घातला खोडा, स्वच्छ सर्वेक्षणात टॉपटेनमध्ये येण्याबाबत व्यक्त केली साशंकता

नाशिकच्या महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला घातला खोडा, स्वच्छ सर्वेक्षणात टॉपटेनमध्ये येण्याबाबत व्यक्त केली साशंकता

Next
ठळक मुद्देएका कार्यक्रमात जाहीरपणे पहिल्या दहामध्ये आपण येऊ शकत नसल्याची कबुलीमागील वर्षी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले होते

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी दत्तक घेतलेले नाशिक शहर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, यासाठी आग्रह धरलेला असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या महापौर मात्र, ‘टॉप टेन’बाबत साशंक आहेत. सोमवारी (दि.८) एका कार्यक्रमात त्यांनी जाहीरपणे पहिल्या दहामध्ये आपण येऊ शकत नसल्याची कबुली देत मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला मध्येच पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, शिवसेनेने मात्र स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली दररोज पदाधिका-यांकडून होत असलेल्या दौ-याबद्दल टीकास्त्र सोडत ‘ही तर केवळ चमकोगिरी’ असल्याची संभावना केली आहे.
मागील वर्षी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यानंतर महापालिकेत सत्तारुढ झालेल्या भाजपाच्या कारकीर्दीत नाशिकने पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला भेट दिली त्यावेळी दिला होता. त्यानंतर, मागील महिन्यात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना पुन्हा जाणीव करून दिली होती. त्यानंतर, गेल्या १ जानेवारीपासून महापौरांसह सत्ताधारी भाजपाचे मनपातील सर्व पदाधिकारी रोज सकाळी पाहणी दौरे करत प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेवर आसूड ओढताना दिसून येत आहेत. या दौ-याचे काही परिणामही दिसून येत आहेत. परंतु, सोमवारी (दि.८) रावसाहेब थोरात सभागृहात अवयवदानासंबंधी झालेल्या एका कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांनी बोलताना नाशिक हे पहिल्या दहा मध्ये येणार नाही, हे मलाही माहिती आहे परंतु, आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन केले. टॉपटेन शहरामध्ये नाशिक येणार नाही, हे महापौरांनी सांगून टाकल्याने प्रशासकीय यंत्रणा निर्धास्त झाली आहे. दरम्यान, शिवसेनेचे महानगरप्रमुख व विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते यांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली पदाधिका-यांच्या सुरू असलेल्या दौ-याची संभावना ‘ही तर चमकोगिरी’ अशी केली आहे. भल्या मोठ्या वाहनांचा ताफा घेऊन पदाधिका-यांचा हा पाहणी दौरा केवळ देखावा आहे. यापूर्वी नगरसेवक म्हणून राहिलेल्या सत्ताधारी पदाधिका-यांच्या प्रभागात अस्वच्छता दिसून येते, याचा अर्थ गेल्या दहा महिन्यात सत्ताधारी प्रशासनावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचे उदाहरण असल्याचीही टीका बोरस्ते यांनी केली आहे.
मिशन स्वच्छ सर्वेक्षण
महापालिकेत प्रत्येक अधिकारी हा सध्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या मिशनमध्ये गुंतला आहे. त्यामुळे आपली कामे घेऊन येणाºया आम नागरिकांना संबंधित अधिकाºयांची भेट दुरापास्त झाली आहे. काही अधिका-यांना नगरसेवकांनी कामासाठी फोन केले तर आपण महापौरांच्या दौ-यात आहोत अथवा स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामात आहोत, अशी उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title:  Nashik Mayor dares the CM's dream, expresses concern about coming in top of clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.