नाशिकमध्ये मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 05:25 PM2019-05-02T17:25:48+5:302019-05-02T17:33:38+5:30

पंचवटी  कारंजा परिसरातील रामालय  हॉस्पिटल शेजारील येवलेकर चाळीत झालेल्या दोन गटात किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना  मंगळवारी  (दि.३०) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

In Nashik, contradictory cases were filed in the case of assault | नाशिकमध्ये मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

नाशिकमध्ये मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देनाशिकच्या पंचवटी परीसरात हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी

नाशिक : पंचवटी  कारंजा परिसरातील रामालय  हॉस्पिटल शेजारील येवलेकर चाळीत झालेल्या दोन गटात किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना  मंगळवारी  (दि.३०) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या महातीनुसार, पंचवटी कारंजा हॉस्पिटल शेजारी आगळे वस्तीत राहणारा विनोद निवृत्ती आगळे ( ३९) मंगळवारी रात्री घराच्या गच्चीवर उभा असतांना परिसरात सुरू असलेल्या एका हळदीच्या कार्यक्रम ठिकाणी अचानकपणे पळापळ सुरू झाल्याने आगळे हा खाली आला त्यावेळी येवलेकर चाळ येथे राहणाऱ्या संशयित आरोपी भूषण बबन गुजरे (१९), व किसान रमेश गुजरे (१९) या दोघांनी आगळे याला शिवीगाळ करून तुला जास्त माज आला आहे का असे म्हणून मारहाण केली. तसेच हातातील कोयत्याने आगळेच्या डोक्यावर वार केला या घटनेत आगळे जखमी झाला आहे. तर दुसरी तक्रार भूषण गुजरे याने दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार गुजरे यांच्या घरासमोर सुरू असलेल्या हळदीचा कार्यक्रमात संशयित आरोपी विनोद आगळे व त्याच्या काही मित्रांमध्ये भांडण सुरू असल्याने गुजरे व त्याचा चुलत भाऊ कृष्णा असे दोघेजण भांडण सोडविण्यासाठी गेले असता आगळे याने हातातील सायकल शॉकअपसरच्या दांड्याने कानावर गालावर मानेवर व डोक्यात मारून जखमी केले तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या आजी हिराबाई व काका रमेश यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून या घटनेत दोन्ही पक्षांनी दिलेल्या फियदीवरून परस्परविरोधी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे पोलिसानी सांगितले.  

Web Title: In Nashik, contradictory cases were filed in the case of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.