पर्यटकांना नाशिकची भुरळ ; पावसाळी पर्यटनासाठी वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 04:50 PM2019-07-07T16:50:33+5:302019-07-07T16:53:01+5:30

कुंभनगरी म्हणून परिचित असलेले नाशिक नेहमीच धार्मिक पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण राहिलेले असून येथील काळाराम मंदीर,पंचवटी, सिंतागुंफा यासह बारा जोतीर्लींगांपैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासोबतच येथील निसर्ग पर्यटनाची मौज लुटण्यासाठी अनेक पयटकांचा नाशिककडे कल वाढला आहे. 

Nashik celebrated for tourists; Rainy tourism has gained momentum | पर्यटकांना नाशिकची भुरळ ; पावसाळी पर्यटनासाठी वाढला कल

पर्यटकांना नाशिकची भुरळ ; पावसाळी पर्यटनासाठी वाढला कल

Next
ठळक मुद्देनाशिकच्या हिरवळीची पर्यटकांना भुरळ पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा ओघ वाढलाधार्मिकसोबत निसर्ग पर्यटकांची नाशिकला पसंती

नाशिक : कुंभनगरी म्हणून परिचित असलेले नाशिक नेहमीच धार्मिक पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण राहिलेले असून येथील काळाराम मंदीर,पंचवटी, सिंतागुंफा यासह बारा जोतीर्लींगांपैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासोबतच येथील निसर्ग पर्यटनाची मौज लुटण्यासाठी अनेक पयटकांचा नाशिककडे कल वाढला आहे. 
नाशिकमधील विविध धार्मिक स्थळे देशविदेशातील पर्यटकांकांचे आकर्षण ठरेले असून पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पसरलेल्या  निर्सग पर्यटकासोबत हिरवळीची धार्मिक पर्यटकांंनाही भुरळ पडत असून गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसासोबतच नाशिकला येणाºया पर्यटकांचेही प्रमाण वाढताना दिसून येत आहे. 

गेल्या दशकभरात नाशिकच्या पर्यटनाच्या कक्षा खूपच विस्तारल्या आहेत. देव-देवतांचा आशीर्वाद लाभलेल्या या भूमीला निसर्गाचेही भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्गसुंदर स्थळांना भेटी देणे हा पर्यटकांचा नित्य उपक्रम बनत असून पावसाळ््यात अनेक पर्यटक नाशिकला पसंती देत आहे. मात्र यातील अनेक पर्यटक गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने कोणतीही पूर्व तयारी न करताच नाशिकच्या पर्यटनासाठी बाहेर पडल्याने त्यांनी शनिवारपासून कोसळणाºया संततधार पावसाने काहीसी गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी पर्यटक पावसापासून बचावासाठी पास्टिकच्या पानघोंगड्यांचा आधार घेताना दिसून येत आहे. तर अनेक पर्यटकांना नाशिकचा मुक्काम वाढवावा लागत असून स्थानिक बाजारपेठेतन रेनकोट छत्र्यांची खरेदी करून अनेक पर्यटक नाशिक पर्यटनाचा आनंद लूटत आहेत. त्यासोबतच कोणत्याही निव्वल पावसात भिजून चिंब होण्यासाठीही अनेक पर्यटक गोदा काठावर दाखल झाल्याचे दिसून येत आहे. 


पर्यटनाची आकर्षणे
 सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे धार्मिक पर्यटनस्थळांत नाशिकचे आगळेच स्थान असून  त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंगसह ब्रह्मगिरी, गंगाद्वार, संत निवृत्तीनाथ मंदीर, सप्तश्रुंग गड, चांदवडची रेणूकादेवी, टाकेदचे जटायू मंदीर, अंजनेरीचे हनुमान मंदीर, रामदास स्वामींची टाकळी, इगतपुरीतील घाटनदेवी, कावनई तीर्थक्षेत्र,   पंचवटीचा गोदाघाट, तपोवन, सिंहस्थ गोदावरी मंदीर, गंगा गोदावरी मंदीर, काळाराम मंदीर, कपालेश्वर मंदीर, सुंदर नारायण मंदीर, नारोशंकराची घंटा, दुतोंड्या मारुती, बालाजी मंदीर, मुरलीधर मंदीर, यशवंतराव महाराज मंदीर, सीतीगुंफा, मोदकेश्वर गणपती, काट्या मारुती, भक्तीधाम, मुक्तीधाम, गुरू गंगेश्वर मंदीर, पांडवलेणी, बुध्द स्मारक,  चामरलेणी अशी एक ना अनेक धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. साईबाबांच्या शिर्डीमध्ये येणारे देश विदेशातील भाविकांना नाशिकच्या पर्यटनाची आकषर्ण असलेली कें द्र भुरळ घालताना दिसून येत आहे. 

Web Title: Nashik celebrated for tourists; Rainy tourism has gained momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.