दोन लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 06:46 PM2018-06-07T18:46:16+5:302018-06-07T18:46:16+5:30

नाशिक : महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. ८ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असून, विभागातील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे या निकालाकडे लक्ष लागून आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आॅनलाइन निकाल पाहाता येणार आहे. यासाठी मंडळाने तीन अधिकृत संकेतस्थळे जाहीर केली आहेत.

nahik,ssc,result,divistion,university | दोन लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता

दोन लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता

Next
ठळक मुद्देआज दहावीचा निकाल : नाशिक जिल्ह्यातील ९६ हजार विद्यार्थीनिकालाची प्रिंटआउटदेखील काढता येणार

नाशिक : महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. ८ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असून, विभागातील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे या निकालाकडे लक्ष लागून आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आॅनलाइन निकाल पाहाता येणार आहे. यासाठी मंडळाने तीन अधिकृत संकेतस्थळे जाहीर केली आहेत.
मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातील २ लाख १० हजार ७८२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक ९६,१९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यातील ३०,२४९, जळगाव जिल्ह्यातील ६३,१५९ आणि नंदुरबार जिल्ह्यातील २१,१८२ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे.
विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहाता येणार आहे. तसेच निकालाची प्रिंटआउटदेखील काढता येणार आहे. मोबाइलवरूनदेखील निकाल पाहण्याची सुविधा बीएसएनएलने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना एमएचएसएससी स्पेस सीटनंबर टाइप करून ५७७६६ या क्रमांकावर पाठवायचे आहे.
आॅनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासूनच विद्यार्थी अधिकृत गुणपत्रकाची वाट न पाहता गुणपडताळणी व छायांकित प्रतींसाठी अर्ज करू शकणार आहेत. यासाठी आवश्यक तो अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. अधिक माहिती हवी असल्यास विद्यार्थी नाशिक विभागीय मंडळाशीदेखील संपर्क करू शकणार आहेत. पुनर्मूल्यांकनासाठी मात्र विद्यार्थ्यांना मात्र प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविणे अपेक्षित आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसºया दिवसापासून पुढील पाच दिवसांत विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात.

Web Title: nahik,ssc,result,divistion,university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.