नगरपंचायतीतले खांदेपालट !

By किरण अग्रवाल | Published: June 3, 2018 02:08 AM2018-06-03T02:08:03+5:302018-06-03T02:08:03+5:30

ग्रामपंचायत ते नगरपंचायत, असा टप्पा गाठत विकासाच्या मार्गावर धावू पाहणाऱ्या जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये नेतृत्वाचा खांदेपालट झाला असून, नवीन पदाधिकाºयांकडेही पूर्वीइतक्याच अपेक्षेने बघितले जाणे स्वाभाविक आहे.

Nagapanchayathe Khandepalat! | नगरपंचायतीतले खांदेपालट !

नगरपंचायतीतले खांदेपालट !

googlenewsNext
ठळक मुद्देअडीच वर्षांपूर्वी प्रथमच निवडणुका पार पडल्या उर्वरित काळासाठी खांदेपालट झाला खांदेपालट नवीन करून दाखविणारा ठरो

ग्रामपंचायत ते नगरपंचायत, असा टप्पा गाठत विकासाच्या मार्गावर धावू पाहणाऱ्या जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये नेतृत्वाचा खांदेपालट झाला असून, नवीन पदाधिकाºयांकडेही पूर्वीइतक्याच अपेक्षेने बघितले जाणे स्वाभाविक आहे. ग्रामपालिकांना नगरपंचायतींचा दर्जा मिळाल्यानंतरच्या पहिल्याच पंचवार्षिकमधील हा नेतृत्वबदल असल्यानेही यासंदर्भातील अपेक्षा जरा अधिकच्याच म्हणता याव्यात.
जिल्ह्यातील कळवण, देवळा, चांदवड, पेठ, सुरगाणा आणि निफाड या सहाही ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आल्यानंतर अडीच वर्षांपूर्वी प्रथमच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. ग्रामविकासाकडून नगरविकासाची संधी म्हणून त्यावेळी पहिल्या पदाधिकाºयांकडून अपेक्षा केली गेली होती. त्यातील काहींनी त्या दिशेने चांगली पावले उचलल्याचेही दिसून आले. परंतु अडीच वर्षांच्या या पहिल्या आवर्तनात व्यवस्था बदलातील नवीनता जाणून घेण्यातही अनेकांचा वेळ गेला. आता उर्वरित काळासाठी खांदेपालट झाला असून, या पदाधिकाºयांकडून केल्या जाणाºया कामांच्या बळावर पुढच्या वेळी त्यांच्या पक्षांना थेट निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनही या पदाधिकाºयांकडून जरा जास्तीच्याच अपेक्षा केल्या जात आहे. विशेष म्हणजे, महापालिका व मोठ्या स्तरावर पक्षीय अभिनिवेशातून काही गोष्टी घडून येताना दिसत असल्या तरी नगरपंचायत, परिषद स्तरावर तितकीशी पक्षीय आढ्यता नसते. कळवणचेच उदाहरण घ्या, काँग्रेस व भाजपा-शिवसेना हे तसे पारंपरिक विरोधक; सद्यस्थितीत तर शिवसेना व भाजपातही टोकाचे वितुष्ट आलेले आहे व स्वबळाची आजमावणी सुरू आहे; परंतु असे असताना कळवण नगरपंचायतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना अशा साºयांनी मिळून विकास आघाडी केली आहे. तेथे साºयांचे व्यवस्थित सुरू आहे. विकासात राजकारण नकोच; पण कळवण शेजारच्या सुरगाण्यात मात्र शिवसेना-भाजपाचे बहुमत असूनही यंदा भाजपाने आपली ‘टर्म’ पूर्ण करून घेतल्यावर शिवसेनेचे बोट सोडून दिले, त्यामुळे सेनेला उपनगराध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले. या दोन्ही पक्षांत त्यामुळे नाराजीचा सुरुंग लागून गेला आहे. दुसरे असे की, खांदेपालट झाला असला तरी काही ठिकाणच्या सत्तेचे सूत्रधार तीच मंडळी राहणार आहे. देवळ्यात दुसºया आवर्तनातही पहिल्याच नगराध्यक्षांकडे सूत्रे आली आहे. चांदवडमध्ये कालचे नगराध्यक्षच आज उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत, तर कळवण येथे काल नगराध्यक्ष असलेल्यांचे पतीच आज उपनगराध्यक्ष बनले आहेत. तेव्हा म्हणायला, पंचवार्षिक सत्तेच्या दुसºया आवर्तनात नेतृत्व बदल झालेला असला तरी सूत्रे तशी जुन्यांकडेच दिसत आहेत. सुरगाण्यात प्रथमच दोन्ही पदांवर महिलाराज अवतरले आहे. या सर्वच नव्या पदाधिकाºयांची जबाबदारी यासाठीही वाढून गेली आहे की, पहिल्या अडीच वर्षाच्या काळात त्यांना संस्थागत बदललेल्या व्यवस्थेची माहिती होऊन गेली आहे. त्यामुळे आता विकासाच्या प्रक्रियेला वेग देऊन नागरिकांच्या अपेक्षापूर्तीच्या दिशेने ठोस कार्यक्रम राबवावा लागेल. त्यादृष्टीने सर्वच नगरपंचायतींमधील खांदेपालट नवीन काही घडविणारा व वेगळे काही करून दाखविणारा ठरो हीच अपेक्षा.

Web Title: Nagapanchayathe Khandepalat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.