महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर सुमारे ४१ टक्के पाणीगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:54 AM2017-11-12T00:54:17+5:302017-11-12T00:57:30+5:30

महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर झाला असून, शहरात विविध कारणांतून सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, सदर अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटर आॅडिटच्या साहाय्याने पाणीपुरवठा विषयक व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत.

Municipal Corporation has reported about 41% of the water audit report submitted by the private agency | महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर सुमारे ४१ टक्के पाणीगळती

महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर सुमारे ४१ टक्के पाणीगळती

Next
ठळक मुद्दे शहरात सुमारे ४१ टक्के पाणीगळती अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे महापालिका प्रशासनाला वॉटर आॅडिटचा अहवाल

नाशिक : महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत केलेल्या वॉटर आॅडिटचा अहवाल प्रशासनाला सादर झाला असून, शहरात विविध कारणांतून सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, सदर अहवाल स्मार्ट सिटी कंपनीकडे सादर करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटर आॅडिटच्या साहाय्याने पाणीपुरवठा विषयक व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. महापालिकेने पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे परीक्षण करण्यासाठी खासगी एजन्सीला काम देण्यात आले होते. त्यानुसार, दीड वर्षांपासून वॉटर आॅडिटचे काम सुरू होते. अखेर, संबंधित एजन्सीने महापालिका प्रशासनाला वॉटर आॅडिटचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, शहरात सुमारे ४१ टक्के पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली. त्यात, प्रामुख्याने, पाइपलाइनसह जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ या ठिकाणी सुमारे १८ टक्क्यांच्या आसपास गळती असून, उर्वरित गळती ही विनामहसुली आहे. वॉटर आॅडिटच्या अहवालाचा आता अभ्यास करून त्यादृष्टीने अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. सदर अहवाल स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीला पाठविण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत गावठाण भागातील पाइपलाइन बदलणे, चोवीस तास पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे, स्मार्ट मीटर बसविणे आदी विविध कामे करण्याचे प्रस्तावित आहेत.  नवीन वर्षात वॉटर आॅडिटच्या अहवालानुसार प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार असल्याचेही चव्हाणके यांनी सांगितले. दरम्यान, वॉटर आॅडिटबरोबरच एनर्जी आॅडिटही करण्यात येत असून, त्याचा अहवालही या महिन्याच्या अखेरीस सादर होण्याची शक्यता आहे. 
प्रशासनापुढे आव्हान 
नाशिक शहराला गंगापूर व दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सर्वसाधारणपणे गंगापूर धरणातून प्रतिदिन ४३० दशलक्ष लिटर्स पाण्याची उचल केली जात आहे. शहरात आजमितीला १०९ जलकुंभ असून, चार जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाण्याची वितरण व्यवस्था चालविली जाते. मात्र, पाणीपुरवठा वितरणात सुमारे ४० टक्के गळती होत असल्याचा आरोप महासभांमध्ये लोकप्रतिनिधी वारंवार करत आले आहेत. जेव्हा जेव्हा पाणीपट्टीचे दर वाढविण्याचे प्रस्ताव महासभेपुढे चर्चेला येतात त्यावेळी पाणीगळती रोखण्याची मागणी प्रशासनाकडे केली जाते. आता वॉटर आॅडिटनुसार पाणीगळती रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.

Web Title: Municipal Corporation has reported about 41% of the water audit report submitted by the private agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.