औद्योगिक विकासाचा पाया असलेल्या एमएसएमई रोजगार देणारा स्त्रोत : अशुतोष राराविकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 04:29 PM2018-02-11T16:29:20+5:302018-02-11T16:37:18+5:30

राष्ट्रीय उत्पन्नात 38 टक्के भाग हा सुक्ष्म, लघु व मध्येम स्वरुपाच्या उद्योगांचा देशात एकूण 5 कोटी एमएसएमई च्यामाध्यमातून 12 कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे

 MSME employer with foundation of industrial development Source: Ashutosh Raraavikar | औद्योगिक विकासाचा पाया असलेल्या एमएसएमई रोजगार देणारा स्त्रोत : अशुतोष राराविकर

औद्योगिक विकासाचा पाया असलेल्या एमएसएमई रोजगार देणारा स्त्रोत : अशुतोष राराविकर

Next
ठळक मुद्दे बँक आणि उद्योग यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण व्हावेसरकार, बँका आणि उदयोग यांत संवाद आवश्यकबीबीएनजीच्या राष्ट्रीय परिषदेत रारावीकर यांचे प्रतिपादन

नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात 38 टक्के भाग हा सुक्ष्म, लघु व मध्येम स्वरुपाच्या उद्योगांचा देशात एकूण 5 कोटी एमएसएमई च्यामाध्यमातून 12 कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार औद्योगिक विकासासोबच रोजगार निमितीसाठी सुक्ष, लघु व मध्यम उद्योगांना विवध योजनांच्या माध्यमातून पाठबळ उभे करीत असल्याचे प्रतिपादन रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक तथा केंद्रीय अर्थखात्याचे सल्लागार अशुतोष राराविकर यांनी केले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्राम्हण व्यावसायिकांच्या ब्राम्हण बिझनेस नेटवर्क ग्लोबलतर्फे (बीबीएनजी) सातपूर येथे रविवारी (दि. 11) राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपच्या उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्यासग व्यासपीठावर संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, बीबीएनजीचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे आदी उपस्थित होते. राराविकर म्हणाले, देशातील लघुउद्योगांच्या विकासासाठी बँक आणि उद्योग यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हायला पाहिजे. यातूनच मोठया प्रमाणात विकास साधता येईल. सोबतच सरकार, बँका आणि उदयोग क्षेत्रतील विविध संघटना यांच्यात चांगला संवाद झाला तरच मोठ्या आणि लघु उद्योगात येणा:या अडचणीवर सहज मात करता येईल. उद्योजकांसाठी अनेक योजना असून अनेकदा या सर्व गोष्टी उद्योजकांना माहीत नसतात. त्यामुळे उद्योजकांच्या संघटनांनी ही त्रूटी दूर करण्याची गरज आहे. जे उदयोग अडचणीत आहेत त्यांना मदत करणो गरजेचे आहेत. त्यासाठी आरबीआयने बँकांना सुक्ष्ण व लघु उद्योगांना आर्थिक सहकार्य करण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले, तसेच उदयोग संघटनांनी व्यवसाय क्लस्टर उभारून त्यातून कौशल्य विकासावर भर देत नवीन उदयोग व उद्योगावचा विस्तार करण्याचा सल्ला देतानाच नाशिकमध्ये संरक्षण, अन्न प्रक्रि या, शेती विषयक उदयोगास भरपूर वाव असून या क्षेत्रतील उद्योजकांना मोठया प्रमाणात संधी व सवलती उपलब्ध असल्याचे अशुतोष रावेरीकर यांनी अधोरेखित केले. आरबीआयच्या सूचनेनुसार एसएमई कॉर्नर सुरू करण्यात आले असून तीन दिवसात कर्ज उपलब्ध करून देण्याची यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीपाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

 

Web Title:  MSME employer with foundation of industrial development Source: Ashutosh Raraavikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.