कर्जमाफीचा पैसा जमा होण्यास सापडला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:57 AM2017-11-01T00:57:37+5:302017-11-01T00:57:44+5:30

दिवाळीपूर्वीच कर्जमाफी प्रमाणपत्र धरून फोटोसेशन झालेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीचा पैसा प्रत्यक्ष जमा होण्यास मुहूर्त सापडला आहे. मंगळवारी (दि.३१) जिल्हा बॅँकेत दीड लाख शेतकºयांपैकी ८७९ शेतकºयांच्या प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे सुमारे तीन कोेटी ७० लाखांचा निधी जमा झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नाशिकच नव्हे तर अहमदनगर जिल्हा बॅँकेसह राज्यातील अन्य जिल्हा बॅँकेतही कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाल्याचे समजते.

Money laundering money has been found to accumulate | कर्जमाफीचा पैसा जमा होण्यास सापडला मुहूर्त

कर्जमाफीचा पैसा जमा होण्यास सापडला मुहूर्त

Next

नाशिक : दिवाळीपूर्वीच कर्जमाफी प्रमाणपत्र धरून फोटोसेशन झालेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीचा पैसा प्रत्यक्ष जमा होण्यास मुहूर्त सापडला आहे. मंगळवारी (दि.३१) जिल्हा बॅँकेत दीड लाख शेतकºयांपैकी ८७९ शेतकºयांच्या प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे सुमारे तीन कोेटी ७० लाखांचा निधी जमा झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नाशिकच नव्हे तर अहमदनगर जिल्हा बॅँकेसह राज्यातील अन्य जिल्हा बॅँकेतही कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाल्याचे समजते.  दरम्यान, ज्या ८७९ शेतकºयांच्या नावे ही पावणे चार कोटींची रक्कम जिल्हा बॅँकेत वर्ग झाली आहेत. त्यात काही तांत्रिक चुका असून, यादीत काही शेतकºयांची चुकीची नावे व दीड लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने यांसदर्भात मंत्रालयातील कर्जमाफीसाठी खास सुरू केलेल्या आयटी विभागाकडून मार्गदर्शन मागविले आहे.  नाशिक जिल्ह्णातून कर्जमाफीसाठी सुमारे दोन लाख ६० हजारांहून अधिक शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा विचार करता जिल्हा बॅँकेने दीड लाखांच्या आतील सुमारे ९० हजार तसेच दीड लाखांच्या  पुढील मात्र कर्जमाफीस पात्र अशा सुमारे २८ ते ३० हजार व नियमित कर्जफेड करणाºया २० हजारांहून अधिक अशा सुमारे १ लाख ३८ हजार शेतकºयांची यादी कर्जमाफीसाठी १ ते ६ विहीत नमुन्यात माहिती मुंबईला पाठविली होती. या यादीत नऊ वर्षांसाठी कर्ज घेणाºया कर्जदार शेतकºयांचीही नावे विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्यात आली होती. मंगळवारी (दि.३१) राज्य स्तरावरून नाशिक जिल्हा बॅँकेत ८७९ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी सुमारे ३ कोटी ७० लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेत वर्ग झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
तांत्रिक चुकांमुळे अडचण
जिल्हा बॅँकेत मंगळवारी कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर शेतकºयांच्या कर्जमाफीच्या रकमेबाबत काही तांत्रिक चुका असल्याचे समोेर आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार एकाच कुटुंबात दीड लाखांच्या वर कर्जमाफीची रक्कमे देता येत नसताना काही कुटुंबांच्या नावे १ लाख ९० हजारांच्या आसपास रक्कम दिसत असल्याचे कळते. तसेच काही शेतकºयांच्या नावांमध्ये व आडनावांमध्ये गफलत असल्याने यासंदर्भात शासन स्तरावरून जिल्हा बॅँकेने मार्गदर्शन मागविले आहे.

Web Title: Money laundering money has been found to accumulate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.