फुलेनगरला मोबाइल चोरट्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:24 AM2018-09-12T02:24:47+5:302018-09-12T02:25:03+5:30

पेठरोडवरील फुलेनगर पाण्याच्या पाटालगत असलेल्या झोपडपट्टीत प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या (३०) या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून दोन ते तीन संशयितांनी खून केल्याची घटना मंगळवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़

Mobile Thievery murders in Fulena Nagar | फुलेनगरला मोबाइल चोरट्याचा खून

फुलेनगरला मोबाइल चोरट्याचा खून

Next
ठळक मुद्देपूर्ववैमनस्य : संशयित फरार

पंचवटी: पेठरोडवरील फुलेनगर पाण्याच्या पाटालगत असलेल्या झोपडपट्टीत प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या (३०) या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून दोन ते तीन संशयितांनी खून केल्याची घटना मंगळवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलेनगर पाटालगत प्रवीण लोखंडे हा सराईत मोबाइल चोरटा राहत असून, मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पाटाजवळील झोपडपट्टीतील एका बोळीत लोखंडे व अन्य दोन तीन संशयितामध्ये पूर्ववैमनस्यातून वाद झाला़ त्यातून संशयितांनी लोखंडे याच्या डोक्यावर हातातील धारदार शस्त्राने वार केले व डोक्यात वर्मी घाव बसल्याने लोखंडे याचा जागीच
मृत्यू झाला़ रक्ताच्या थारोळ्यात युवक पडलेला पाहून नागरिकांनी त्वरित पंचवटी पोलिसांना
माहिती दिली़ यानंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी
धाव घेतली़ मात्र, तोपर्यंत
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोखंडे याचा मृत्यू झाला होता़
पोलिसांनी त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे़
सराईत गुन्हेगार लोखंडे याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात मोबाइल चोरी तसेच शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले़ वर्चस्ववादातून खून झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी ठिकठिकाणी पोलीस पथके रवाना केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाहून संशयितांची दुचाकी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे़ तसेच रक्ताचे नमुने व अन्य काही संशयास्पद वस्तू न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकाने तपासकामी जमा केल्या आहेत़ लोखंडे या गुन्हेगाराचा खून करणाºया संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असल्याचा दावा पंचवटी पोलिसांनी केला आहे.

Web Title: Mobile Thievery murders in Fulena Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.