चांदोरीत मेथीला १ रुपया भाव :  मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:31 AM2017-11-28T00:31:31+5:302017-11-28T00:32:26+5:30

गेल्या दोन दिवसांपासून मेथीचे बाजारभाव सातत्याने कोसळत असून, सोमवारी १०० रुपये शेकडा भाव मिळाल्याने चांदोरी भागातील शेतकºयांनी मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकत संताप व्यक्त केला.

Methyl of rupture 1 rupee: Furious rage on fused road with fenugreek | चांदोरीत मेथीला १ रुपया भाव :  मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकत संताप

चांदोरीत मेथीला १ रुपया भाव :  मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकत संताप

Next

कसबे सुकेणे : गेल्या दोन दिवसांपासून मेथीचे बाजारभाव सातत्याने कोसळत असून, सोमवारी १०० रुपये शेकडा भाव मिळाल्याने चांदोरी भागातील शेतकºयांनी मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकत संताप व्यक्त केला.  नाशिक व वाशी या मोठ्या भाजीपाला बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची मोठी आवक सुरू झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चांगला बाजारभाव असलेल्या मेथीची आवक वाढल्याने रविवारपासून मेथीचे भाव गडगडण्यास प्रारंभ झाला. सोमवारी १०० रुपये शेकडा बाजारभाव मेथीला मिळाल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गोदाकाठच्या गावांतून नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होती.  भाव कोसळल्याने जुड्या रस्त्यावर ओतून शेतकºयांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. मेथीला एकरी वीस हजार रुपये खर्च येतो. परंतु १०० रुपये शेकडा भाव म्हणजे प्रतिजुडी एक रुपया असा भाव मिळाला, तर इतर उत्पादन खर्च तर दूरच; परंतु भाजी काढण्याची मजुरी सुटत नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली.

Web Title: Methyl of rupture 1 rupee: Furious rage on fused road with fenugreek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.