विवाह मंडपातून समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:04 AM2018-05-15T01:04:37+5:302018-05-15T01:04:37+5:30

विवाह समारंभ म्हटला की अत्यंत अफलातून प्रयोग व संकल्पना पाहावयास मिळतात; मात्र काही संकल्पना या समाजाच्या भल्यासाठी राबविल्या जातात. विवाह सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्याकडे समाजप्रबोधनाची संधी म्हणून पाहत एका नाशिककर कुटुंबाने समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याने हा विवाह चर्चेचा ठरला.

Message from social welfare and environment conservation through marriage board | विवाह मंडपातून समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

विवाह मंडपातून समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next

नाशिक : विवाह समारंभ म्हटला की अत्यंत अफलातून प्रयोग व संकल्पना पाहावयास मिळतात; मात्र काही संकल्पना या समाजाच्या भल्यासाठी राबविल्या जातात. विवाह सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्याकडे समाजप्रबोधनाची संधी म्हणून पाहत एका नाशिककर कुटुंबाने समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याने हा विवाह चर्चेचा ठरला.  नवनाथपंथी सामाजिक बहुद्देशीय संस्था व कानडे-शिंदे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे सचिव चेतन कानडे यांचा विवाह नुकताच शहरात पार पडला. त्यांचा हा विवाह चर्चेत आला तो केवळ समाजप्रबोधनाच्या संकल्पनेमुळे. या विवाह सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांचे टॉवेल-टोपी नव्हे, तर चक्क कापडी पिशवी आणि तुळस, अमृतवृक्ष कडुनिंबाची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. तसेच स्वागत कक्षाजवळ दोन्ही परिवारांच्या नावांचा स्वागत फलक नव्हे तर चक्क सुरक्षित वाहतूक व रस्ता सुरक्षेविषयीचे प्रबोधन करणारा ‘स्टॅन्डी’ पाहुण्यांच्या नजरेस पडत होता. तसेच ‘स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर’, ‘वृक्ष संवर्धन, काळाची गरज’, ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे प्रबोधनात्मक वाक्य लिहिलेल्या सचित्र फलकांनी आलेल्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.  प्लॅस्टिक वापराचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम दाखविणाºया फलकासोबत अनेकांनी ‘सेल्फी’ही घेतली.  लग्नपत्रिका घरोघरी जाऊन वाटपाची प्रथाही या कुटुंबाने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास सकारात्मक बदल घडून येतो; मात्र त्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची. या कुटुंबाने पारंपरिक विवाह सोहळ्यात अशाच प्रकारे बदल घडवत समाजप्रबोधनावर भर दिला. विवाहाच्या आमंत्रणपत्रिकेच्या माध्यमातून नव्हे तर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत ‘स्मार्ट’ पद्धतीने दिले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांद्वारे तसेच भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत अगत्याचे निमंत्रण आपल्या मित्र-परिवाराला दिले.
‘अक्षता’  फेकू नका...
विवाह सोहळ्यात ‘अक्षता फेकू नका, तर त्या अक्षता दानपात्रात टाका’ अक्षतेच्या रूपाने वाया जाणाºया धान्याच्या माध्यमातून गोरगरिबांचे एकवेळचे जेवण सहज होऊ शकते, असा सामाजिक संदेशही त्यांनी यावेळी मंडपातून दिला. या विवाह सोहळ्यात अक्षता ऐवजी वधू-वरांवर आलेल्या वºहाडी मंडळींनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या.

Web Title: Message from social welfare and environment conservation through marriage board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक