‘नाशिक मॅरेथॉन’द्वारे समानतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:26 AM2019-02-25T00:26:37+5:302019-02-25T00:27:15+5:30

पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात रविवारच्या सुटीचा आनंद द्विगुणित करत नाशिककरांनी पोलिसांसमवेत एकच धाव घेत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला.

 Message of equality through 'Nashik Marathon' | ‘नाशिक मॅरेथॉन’द्वारे समानतेचा संदेश

‘नाशिक मॅरेथॉन’द्वारे समानतेचा संदेश

googlenewsNext

नाशिक : पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात रविवारच्या सुटीचा आनंद द्विगुणित करत नाशिककरांनी पोलिसांसमवेत एकच धाव घेत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. ‘नाशिक मॅरेथॉन’ स्पर्धेत सहभागी नाशिककरांचा सळसळता उत्साह देशभक्तीपर गीतांनी अधिकच वाढविला. या स्पर्धेत पुरुष गटात केनियाच्या फेलिक्स व लक्ष्मी हिरालाल यांनी बाजी मारली.
सालाबादप्रमाणे यावर्षीही नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात रविवारी (दि.२४) मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्त्री-पुरुष समानता’ असे स्पर्धेचे घोषवाक्य ठेवण्यात आले होते. सहभागी स्पर्धकांनी या घोषवाक्यद्वारे समाजात जनजागृतीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून पहाटे ५वाजता या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सिनेअभिनेता ‘उरी’फेम विकी कौशल, पुष्कर जोग, मृणाल कुलकर्णी विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजें, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या अश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे, उमहापौर प्रथमेश गिते यांच्यासह सर्व धर्मगुरुंच्या उपस्थिती होती. विविध गटांत झालेल्या या मॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या नाशिककरांनी उत्साहात सहभाग नोंदविला. मॅरेथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्र मांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्र मासाठी शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी विशेष पुढाकार घेतला होता. मॅरेथॉनमध्ये सहभागी नाशिककरांनी या वादनावर ताल धरला. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने वाजविलेल्या देशभक्तीपर गीतांच्या धूनने स्पर्धक ांचा उत्साह सळसळता ठेवला.

या संस्थांचा सहभाग
जैन सोशल ग्रुप युवा फोरम, अग्रवाल सभा नाशिक-अग्रवाल महिला मंडळ, जेसीआय ग्रेपसिटी नाशिक, शिवसह्याद्री सामाजिक केंद्र नाशिक, सौभाग्य महिला मंडळ, हितगुज महिला मंडळ, कल्याणी महिला मंडळ यांसह विविध सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला. बेटी बचाओ, बेटी पढाओ, मुलगी वाचवा, मुलगी जगवा, आन हैं शान हैं बेटिया वरदान हैं... अशा प्रकारचे समाजप्रबोधन फलक झळकावित या संस्थांच्या सदस्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला.

स्पर्धेच्या विविध गटांतील पहिल्या तीन क्रमांकाचे विजेते
४२ कि.मी. (पुरु ष १८ ते ४० वयोगट)
प्रथम : फ्लेक्स रोप (केनिया), द्वितीय : अडिनिव्ह तोलेसा (इथोपिया), तृतीय : विजय शेवरे (नाशिक).
४२ कि.मी. (पुरु ष ४१ वर्षावरील)
प्रथम : पीटर मोंगी (केनिया), द्वितीय : भास्कर कांबळे (वाशिम), तृतीय : अनिल टोकरे (दादर-नगर हवेली)
४२ कि.मी. (महिला १८ ते ४० वयोगट)
प्रथम : लक्ष्मी हिवलाला (उत्तर प्रदेश), द्वितीय : ज्योती गुंजाळ (नाशिक), तृतीय : गुंजन कोळी (मुंबई)
२१ कि.मी. (पुरु ष : १८ ते ४० वयोगट)
प्रथम : संताजी महाजन (धुळे), द्वितीय : विनोद वळवी (नंदुरबार), तृतीय : शिवम कमानकर (सामनगाव)
२१ कि.मी. (पुरु ष - ४१वर्षावरील)
प्रथम : दत्तात्रय जायभावे (पुणे), द्वितीय : अशोक पवार (नाशिक), तृतीय : भिकू खैरनार (मालेगाव)
२१ कि.मी. (महिला १८ते ४०वयोगट)
प्रथम : प्राजक्ता गोडबोले (नागपूर), द्वितीय : निवृत्ती धावड (नाशिक), तृतीय : श्रृती पांडे (नाशिक).
२१ कि.मी. (महिला ४०वर्षावरील)
प्रथम : विद्या धापोदकर (नागपूर), द्वितीय : प्रतिभा नांदकर (मुंबई), तृतीय : डॉ. अवंती बेनीवाल (पुणे)
१० कि.मी. (पुरु ष - ४१ वर्षावरील)
प्रथम : रजित कुंभारकर (बेळगाव), द्वितीय : रमेश चिरीलकर (पुणे), तृतीय : मिलानी लोकोमन (अलीबाग)
१० कि.मी. (महिला १८ ते ४० वयोगट)
प्रथम : रिजवाना केवरी (पोलीस अकादमी), द्वितीय : मृणाल माळी, तृतीय : सुषमा पवार (नंदुरबार).
१० कि.मी. (महिला ४० वर्षावरील)
प्रथम : सुमन हाटकर (नाशिक), द्वितीय : आरती चौधरी (नाशिक), तृतीय : नितू सिंग (नाशिक).
१० कि.मी. (पुरु ष १० ते ४० वयोगट)
प्रथम : शुभम मोरे, द्वितीय : राकेश निकुंभ, तृतीय : गिनो अन्टोनी
५ कि.मी. (पुरु ष १८ ते ५० वयोगट)
प्रथम : शुभम ज्ञानयान (नाशिक), द्वितीय :
अतुल बर्डे (नाशिक), तृतीय : दयाराम गायकवाड (नाशिक)
(महिला १८ ते ५० वयोगट)
प्रथम : मोनिका जाधव (नाशिक), द्वितीय : लक्ष्मी दिवे (नाशिक), तृतीय : नंदा पालवे (नाशिक)
३ कि.मी. (महिला ५० वर्षांवरील)
प्रथम : प्रमिला हिरगुल (नाशिक), द्वितीय : जया पाटील (नाशिक), तृतीय : वंदना सोनवणे (नाशिक)
(पुरु ष ५० वर्षांवरील)
प्रथम : अशोक आमने (पुणे), संजय शीलाधानकर (अलिबाग), शौकत मुलाणी (नाशिक).

Web Title:  Message of equality through 'Nashik Marathon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.