मेघदूतांनी अनेकांना पाडली भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:57 PM2019-07-04T23:57:00+5:302019-07-04T23:58:13+5:30

मालेगाव : मराठी साहित्य संघातर्फे कालिदास दिन साजरामालेगाव : महाकवी कालिदास हे जगातील सर्वश्रेष्ठ कवी, साहित्यिक होत. त्यांच्या मेघदूतावर महान साहित्यिकांनी भाष्य केले तरी तो अद्यापही उमगला नाही. मेघदूताची छाप आजही कायम असल्याचे प्रतिपादन डॉ. धर्मेंद्र मुल्हेरकर यांनी केले.

Meghdoots seduce many | मेघदूतांनी अनेकांना पाडली भुरळ

मालेगाव येथील कॅम्प सार्वजनिक वाचनालयात बोलताना डॉ. धर्मेंद्र मुल्हेरकर. समवेत शिवाजी साळुंखे, रमेश उचित.

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव : मराठी साहित्य संघातर्फे कालिदास दिन साजरा

मालेगाव : महाकवी कालिदास हे जगातील सर्वश्रेष्ठ कवी, साहित्यिक होत. त्यांच्या मेघदूतावर महान साहित्यिकांनी भाष्य केले तरी तो अद्यापही उमगला नाही. मेघदूताची छाप आजही कायम असल्याचे प्रतिपादन डॉ. धर्मेंद्र मुल्हेरकर यांनी केले.
मालेगाव मराठी साहित्य संघातर्फे आयोजित कालिदास दिनानिमित्त बुधवारी सायंकाळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मुल्हेरकर बोलत होते. अध्यक्षस्थानी रमेश उचित, शिवाजी साळुंखे उपस्थित होते. डॉ. मुल्हेरकर म्हणाले, कालिदासाच्या साहित्याचे अनेकांनी अनुवाद केला असला तरी मेघदूतांचा अर्थ अपूर्ण राहतो. कालिदास दिन हा संस्कृत दिन असल्याचा गौरव करत आपल्या कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कविसंमेलन घेण्यात आले. यात भिला महाजन, सचिन लिंगायत, रविराज सोनार, संजय पांडे, विवेक पाटील, शेखर कापसे यांनी कविता सादर केल्या. प्रास्ताविक रमेश उचित यांनी केले. सूत्रसंचलन सचिव राजेंद्र दिघे यांनी, तर जगदीश वैष्णव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सयाजी पगार, महेश जहागिरदार, सुरेश गरुड, राजेश जाधव, रमेश पाटील, किरण पाटील, विजय डोखे, विशाल धिवरे, रमेश आदी उपस्थित होते.

Web Title: Meghdoots seduce many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.