मनमाडला इंधनचोरी; चार जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:17 AM2019-03-15T00:17:44+5:302019-03-15T00:18:07+5:30

नांदगाव रोडवर माउलीनगर येथे पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकत इंडियन आॅइल कंपनीच्या टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला रंगेहात पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून बनावट चाव्यांसह दोन टँकर, त्यातून काढण्यात आलेले इंधन असा एकूण ३२ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Manmad's fuel economy; Four people caught | मनमाडला इंधनचोरी; चार जणांना पकडले

मनमाडला इंधनचोरी; चार जणांना पकडले

Next

मनमाड : नांदगाव रोडवर माउलीनगर येथे पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकत इंडियन आॅइल कंपनीच्या टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला रंगेहात पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून बनावट चाव्यांसह दोन टँकर, त्यातून काढण्यात आलेले इंधन असा एकूण ३२ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
इंडियन आॅइल कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून टँकर (क्र. एमएच १९ झेड ४७४१) पेट्रोल भरून निघाल्यानंतर तो मूळ ठिकाणी न जाता नांदगाव रोडवर सह्याद्री हॉटेलच्या मागे माउलीनगर वसाहतीमध्ये नेण्यात आला. तेथे टँकरचे कुलूप बनावट चावीने उघडून पेट्रोल काढले जात होते.
मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार देवीदास ठोके, शरद देवरे, महारू माळी, किरण दासरवार आदींच्या विशेष पथकाला घटनास्थळी पाठविले. या पथकाने छापा मारून टँकरमधून पेट्रोल काढताना चार जणांच्या टोळीला रंगेहात पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून बनावट चाव्यांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रकाश शिवाजी दराडे, विष्णू लटपटे, सतीश गायना पगारे, प्रमोद काशीनाथ देसले या चारही आरोपीं-विरुद्ध मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Manmad's fuel economy; Four people caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.