सोनांबे परिसरात मशागतींच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 06:20 PM2019-06-22T18:20:15+5:302019-06-22T18:21:25+5:30

सोनारी, सोनांबे, कोनांबे, धोंडबार, औंढेवाडी येथे मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. मॉन्सून लांबल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून वरुणराजाची प्रतीक्षा करीत आहे.

 Mammal work in Sonambe area | सोनांबे परिसरात मशागतींच्या कामांना वेग

सोनांबे परिसरात मशागतींच्या कामांना वेग

googlenewsNext

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागातील सोनारी, सोनांबे, कोनांबे, धोंडबार, औंढेवाडी येथे मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. मॉन्सून लांबल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून वरुणराजाची प्रतीक्षा करीत आहे. खरिपाच्या सोयाबीन, भुईमूग पिकासाठी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करून ठेवली आहे. मात्र, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. पाऊस उशिरा आला, तर पुन्हा पीक काढणीवेळी अवकाळी पावसाने हाती आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होते. त्यातून ‘मागे दुष्काळ पुढे अवकाळी’ अशा निसर्गाच्या कात्रीत शेतकरी अडकला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले. आता आर्द्रा नक्षत्र सुरू होईल ते बरसले तर शेतकºयांच्या आशा पल्लवित होणार आहेत.

Web Title:  Mammal work in Sonambe area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.